पंढरपूर – अखिल भारतीय हिंदुमहासभेची स्थापना हरिव्दार येथे सोमवार १३ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाल्याची माहिती येथील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश पदाधिकारी अभयसिंह कुलकर्णी (इंचगावकर) यांनी दिली.
या स्थापना दिना संदर्भात माहिती देताना कुलकर्णी (इंचगावकर) यांनी सांगितले की, अखिल भारतीय हिंदूमहासभेचा १३ एप्रिल हा स्थापना दिन. हरिद्वार येथे १११ वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात आजच्या दिवशीच अ.भा. हिंदुमहासभेची स्थापना झाली होती. त्यामुळे हरिद्वार येथेच हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न व्हावा अशी सर्वानुमते विनंती करण्यात आली होती. त्या नुसार हरिव्दार येथे हा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अ.भा. हिंदुमहासभेची कार्यसमिती बैठक ही पार पडली.
या बैठकीसाठी महाराष्ट्रातून अनिलराव पवार, प्रदेशाध्यक्ष व अभयसिंह कुलकर्णी इचगावकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध प्रदेशांतून मान्यवर व हरिद्वार निवासी, मान्यवर संत, महंत यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अ.भा.हिंदूमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्नाकुमार शर्मा यांनी भूषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेशजी त्यागी यांनी केले.
दरम्यान हरिव्दार येथील राजपूत पंचायती धर्मशाळा सभागृह यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेले होते. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजे पर्यंत या सभागृहात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी पार पडल्याचे देखील यावेळी अभयसिंह कुलकर्णी यांनी सांगितले.
























