मोडनिंब – भगवत प्राप्तीसाठी दोन उपाय; भगवंताचे नामस्मरण आणि श्रीमद् भागवत कथेचे श्रवण होय बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर भगवत प्राप्तीसाठी दोन प्रमुख उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि श्रीमद् भागवत कथेचे श्रवण होय, असे प्रतिपादन बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केले. मोडनिंब येथे सुरू असलेल्या भागवत कथेच्या चौथ्या दिवशीच्या कथेच्या विवेचनात त्यांनी सांगितले. चित्ताच्या ठिकाणी विषयाचे चित्र उमटते; विषयाचे चित्र वांध केल्याशिवाय जीवाला गती प्राप्त होऊ शकत नाही.
संपत्तीत समाधान नाही, समाधान प्रेमात आहे,” असे बालयोगी गोपाळ महाराज कारखेडकर यांनी सांगितले.निष्ठेने धर्म आचरण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. खरे समाधान संपत्तीमध्ये नसून प्रेमामध्ये आहे, असेही त्यांनी नमूद केले.कोणाचा द्वेष करू नका, कुणाबद्दल वाईट विचार करू नका. उपेक्षा वृत्ती धारण करा असे आवाहन बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केले.
मोडनिंब (ता.माढा) येथे बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांची भागवत कथा भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरु आहे.मोडनिंब येथे गुरुवार पासून कथेला सुरवात झाली. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपादबाबा यांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त या संगीतमय सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संगनबसवेश्वर मठ येथे सप्ताह पार पडणार आहे. रोज सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात टेंभुर्णी, मोडनिंब, अरण व बावी, गिड्डेवाडी, आष्टी, तेलंगवाडी, शेटफळ, जाधववाडी, तुळशी, बैरागवाडी,भेंड येथील हजारो भाविक सहभागी होतात. प्रासादिक अमृत वाणीतून कथा श्रवनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
























