सांगोला – श्री अंबिका देवी देवस्थान, सांगोला येथे रविवार पासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार असून श्री तुळजाभवानी नवरात्र उत्सव मित्र मंडळ, जुने मंदिर यांच्यावतीने रविवार दि.११ ते मंगळवार दि.२० ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवीचे पुजारी तुकाराम गुरव यांनी दिली. रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी श्री देवीची घटस्थापना करण्यात येणार असून दररोज पहाटे ३ ते ६ या वेळेत श्री देवीला अभिषेक, भोगीपूजा व आरती करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत अलंकार पूजा, दुपारी ३ ते ४ वा. भजन सेवा व रात्री ७ ते १० या वेळेत गोंधळ गीत, आरती व देवीचा छबिना निघणार आहे.
अलंकार पूजेमध्ये रविवार दि.११ ऑक्टोबर रोजी शैलपुत्री पूजा व श्रीराम महिला भजनी मंडळ, सोमवार दि.१२ ऑक्टोबर रोजी ब्रह्मचारिणी पूजा व श्री दत्त महिला भजनी मंडळ, मंगळवार दि.१३ ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा पूजा व यमाई महिला भजनी मंडळ, बुधवार दि.१४ ऑक्टोबर रोजी कृष्णमंडा पूजा व स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, गुरुवार दि.१५ ऑक्टोबर रोजी स्कंदमाता पूजा व बसवेश्वर महिला भजनी मंडळ, जय तुळजाभवानी महिला भजनी मंडळ, शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर रोजी कात्यायनी पूजा व रुद्र महिला भजनी मंडळ, ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ, शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी कालरात्री पूजा व श्री विठ्ठल महिला भजनी मंडळ, चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ, रविवार दि.१८ ऑक्टोबर रोजी महागौरी पूजा व गुरुमाऊली महिला भजनी मंडळ, श्री साई महिला भजनी मंडळ हे भजन सेवा करणार आहेत. सोमवार दि.१९ ऑक्टोबर रोजी महाष्टमीनिमित्त श्री अंबिका देवीस सिंहासन पूजा करण्यात येणार असून रात्री १२ वाजता आरती व होम होणार आहे. तरी भाविक भक्तांनी सदर उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच ज्या भक्तांना देवीचा अभिषेक व पूजा करावयाची आहे त्यांनी मो.नं.९५७९३०५६५७ यावर संपर्क साधावा असे आवाहन देवीचे पुजारी ओंकार गुरव यांनी केले आहे.
Post Views: 10