Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 6, 2024
in solapur
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज-इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत, वय 38 वर्षे , राहणार बक्षीहिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या हुंडाई सेंट्रो कार क्रमांक MH 12 AN 5627 मधून चार रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले, त्याच्या ताब्यातून दोन लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे,सहायक दुय्यम निरीक्षक आलेत शेख जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांचे पथकाने केली. जिल्हाभरात राबविलेल्या हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवरील मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील विविध हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून 180 लिटर हातभट्टी दारू व 12450 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण चार लाख शहांशी हजार नऊशे पन्नास किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

शनिवारी निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने की केगाव शिवाजीनगर परिसरातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रुकेश लक्ष्मण चव्हाण वय 21 वर्षे या इसमास 3500 लिटर रसायनासह पकडले. दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांनी देशमुख वस्ती केगाव येथे हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून सातशे लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांनी वैराग ता.बार्शी येथून अजित बाबासाहेब करांडे या इसमास साडेचार लिटर विदेशी दारू विक्री करताना पकडले तसेच त्यांच्या पथकाने सौरभ बाळू गेले या इसमास पावणेदहा लिटर बियर व साडेपाच लिटर विदेशी दारू विक्री करताना उपळाई ता. बार्शी या ठिकाणी गुन्हा नोंदवला. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल त्रिशूल मधून अल्ताफ रमजान शेख याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या नऊ बाटल्या व किंगफिशर बियर 650 मिली क्षमतेच्या दहा बाटल्या व अक्कलकोट ते हन्नूर रोडवरील प्रशांत चायनीज मधून विनायक अशोक जाधव याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्लू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या बारा सीलबंद बाटल्या जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.

 

शनिवारी निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने महूद ता. सांगोला येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 900 लिटर रसायन जागीच नाश केले तसेच लखन रामचंद्र पवार वय तीस वर्षे याला त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक. MH45 AA 6356 वरून प्लास्टिक कॅन मधून 35 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने शिंगोर्णी ता. माळशिरस येथे अजित उत्तम बोडरे वय 28 वर्षे याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 180 मिली क्षमतेचे 27 बाटल्या जप्त केल्या. दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने हतीद ता.सांगोला या ठिकाणी रखमाजी बाळा शिंदे याच्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 950 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केले. दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांनी भाळवणी ता. करमाळा येथून दत्तू सोपान काळे याला 30 लिटर हातभट्टी दारू व 800 लिटर रसायनासह अटक केली.

 

दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांनी पोहोरगाव ता.पंढरपूर येथून लतिका हंबीर काळे या महिलेच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या देशी दारू संत्र्याच्या 55 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. निरीक्षक सीमा तपासणी नाका नांदणी यांच्या पथकाने तोगराळी ता. दक्षिण सोलापूर येथे लक्ष्मीनारायण बालय्या मच्छा यांच्या ताब्यातून सत्तर लिटर ताडी व जिजाबाई देवेंद्र तेलंग या महिलेच्या ताब्यातून 24 लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 402 गुन्ह्यात 323 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत विभागाने 12654 लिटर हातभट्टी दारू, एक लाख 73 हजार 320 लिटर गुळमिश्रित रसायन, 705 लिटर देशी दारू, 345 लिटर विदेशी दारू, 206 लिटर बियर, सतराशे सत्तावीस लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील दारू व 47 वाहने जप्त केली आहेत.

 

जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत 89 लाख 18 हजार असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी 36 लाख 85 हजार इतकी आहे. जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये निवडणूक मतदान संपण्याच्या 48 तासापूर्वी म्हणजेच 5 मे सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे घोषित करण्यात आला असून सर्व मद्य विक्री दुकाने सात मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात एकूण बारा पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस धाबे, होटल, संशयित मद्य विक्री ठिकाणे, हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे इत्यादी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहे. तसेच वागदरी ता. अक्कलकोट, नांदणी ता. दक्षिण सोलापूर व मरवडे ता. मंगळवेढा या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.अधीक्षक व उप अधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे.

Post Views: 52
Previous Post

दै.सोलापूर तरुणभारत – सकाळच्या घडामोडी

Next Post

मतदान केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आयोगाने दिले साहित्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मतदान केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आयोगाने दिले साहित्य

मतदान केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आयोगाने दिले साहित्य

ताज्या बातम्या

सभापती चाकोतेंनी डेन्मार्कमधून मोदींच्या चाहत्यांची क्लिप व्हायरल केली #viral

May 21, 2026

माझ्या लेकराला वाचवा हो म्हणत आईने फोडला टाहो #solapurnews #viral

May 21, 2026

एलपीजीला पार्याय ; बालाजी अमाईन्सचे डायमिथाईल इथर निर्मितीत पाहिले पाऊल #solapurnews #marathinews

May 21, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873527

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697