जेऊर – करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप फार्म हाऊस येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या २३ ऑगस्ट रोजी दिवसभर या शर्यतीचा थरार रंगणार असून सुमारे ५०० बैलगाडे सहभागी होण्याची शक्यता आहे.
या भव्य बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटनासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरव राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. गुळसडी येथील मैदानावर या स्पर्धेसाठी ८०० फूट लांबीचा ट्रॅक तयार करण्यात आला असून स्पर्धेचे नियोजन पूर्ण झाले आहे.
विजेत्यांवर लाखोंची बक्षीसांची बरसात !
स्पर्धेसाठी सुमारे ४ लाख रूपयांची आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १ लाख ५५५ रू. बक्षीस असून द्वित्तीय क्रमांकासाठी ८५ हजार ५५५ रू., तृतीय क्रमांकासाठी ६५ हजार ५५५ रू. चौथ्या क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रू. बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ आणि नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रूपये अशी बक्षीसांची लयलूट होणार आहे.
या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने करण्यात आले आहे.