Thursday, May 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चंद्रभागेच्या वाळवंटातील भिक्षेकऱ्यांचे भिक्षा मागण्याचे अनोखे फंडे

तरुण भारतbyतरुण भारत
January 1, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सध्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरात धार्मिक पर्यटनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. या मध्येच येथील भिक्षेकरी मंडळीं देखील हायटेक झाली असून भिक्षा किंवा भिक मागण्यांचे त्यांनी देखील नवनवे फंडे शोधलेले दिसत आहेत.  


पंढरपूर हे राज्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. वर्षभरात आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या चार प्रमुख यात्रा या ठिकाणी भरत असतात. त्याच प्रमाणे गेल्या आठ ते दहा वर्षापासून नववर्षे स्वागत, शनिवार, रविवार तसेच इतर लागुन सुट्या आल्यावर तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या शिवाय दररोज या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ हजार भाविकांची मांदियाळी दिसुन येते. सहाजिकच त्यामुळेच इतर देशातील इतर तिर्थक्षेत्रां प्रमाणेच येथे देखील भिक्षेकरी मंडळींची संख्या मोठी दिसत आहे. येथील भिक्षेकरी मंडळी देखील हायटेक झालेली आहेत. त्यांनी देखील भिक मागण्याचे नवनवे फंडे शोधलेले आहेत.


येथील चंद्रभागेचे वाळवंट, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्ग,कैकाडी महाराज मठ, गजानन महाराज मठ आदी मोठे मठ,धर्मशाळांच्या परिसरात भिक्षेकऱ्यांची वर्दळ दिसून येते. येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात काही भिक्षेकरी आपल्या बिऱ्हाडासह वास्तव्यास दिसतात.येथे वास्तव्यास असणारे अनेक भिक्षेकरी व्याजाने देखील पैसे देत असल्याचे येथील चंद्रभागा नदीच्या परिसरातील व्यवसायीक मंडळी तसेच वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून आवर्जून सांगितले जाते.


येथील अनेक भिक्षेकरी मंडळींकडून सुट्या पैशाचे देखील व्यवहार केले जातात. विशेषत: यात्रांच्या काळात स्थानिक व्यापारी सुट्या पैशांची अडचण असताना अव्वाच्या सव्वा दराने बंद्दे पैसे घेऊन सुट्टे पैसे देतात. या बरोबरच तांबे,पितळेच्या जुन्या तसेच दुर्मिळ नाण्यांचा व्यवसाय करुन अव्वाच्या सव्वा पैसे मिळवितात. अनेक भिक्षेकरी नागरिकांकडून सुट्या पैशांचे झंझट नको म्हणून खास स्कँनरची देखील व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत आहे. 
—————————
भिक्षामागण्या बरोबरच इतर देखील व्यवसाय
येथील चंद्रभागेच्या वाळवंटातील भिक्षेकरी भिक्षा मागण्या बरोबरच चंद्रभागा नदीच्या ओटीचे साहित्य अर्थात खण,नारळ तसेच चंद्रभागेत दिपदान करण्यासाठी लागणारे द्रोण,दिवे आदी प्रासादिक साहित्य विक्रीचे तसेच रांगोळींचे छाप आदी व्यवसाय देखील करीत असल्याचे सांगितले जाते. दररोज सकाळच्या वेळी गर्दी असताना हे व्यवसाय करता यावेत यासाठी भिक्षेकरी मंडळी नदीच्या घाटांवरील प्रत्येक पायरींवर ( ज्या, त्या भिक्षेकऱ्यांच्या ज्या, त्या पायऱ्या ठरलेल्या ) आपली टोपली, परडी आणि त्या मध्ये देवतांच्या मुर्ती ठेवून आपले इतर व्यवसाय सांभाळत असतात. येथे येणारे भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी जाताना किंवा स्नान करुन परत येताना त्यांनी ठेवलेल्या दुरडी,टोपल्यांमधून सुट्या किंवा बंद्या (नोटा ) पैशाची भिक्षा टाकीत पुण्याचे काम मानून चंद्रभागा स्नान,पुंडलिक दर्शनाचे पुण्य पदरात पाडून घेतल्याचे समाधान मानतात. इकडे भिक्षेकरी मात्र बिनभांडवलाचा एकापेक्षा एक फंडे वापरुन आपल्या भिक्षा मागण्याच्या व्यवसायात गब्बर होतात.

Post Views: 40
Previous Post

स्टार प्रवाहवर इतिहास जिवंत होणार… ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा पहिला भाग पाहायलाच हवा

Next Post

शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मुदत संपली… प्रशासनाने केली चालढकल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मुदत संपली... प्रशासनाने केली चालढकल

ताज्या बातम्या

बंगालमध्ये भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या #viral #public

May 7, 2026
न्यायालयीन प्रकियाचा निकालनपाच्या बाजुने ७ अनधिकृत इमारती पत्राशेड केले जमीनदोस्त

न्यायालयीन प्रकियाचा निकालनपाच्या बाजुने ७ अनधिकृत इमारती पत्राशेड केले जमीनदोस्त

May 7, 2026
गॅस दरवाढीविरोधात उद्धव सेनेचा ‘चूलपेटो’ आंदोलन

गॅस दरवाढीविरोधात उद्धव सेनेचा ‘चूलपेटो’ आंदोलन

May 7, 2026
 डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर

 डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार साहित्यिक डॉ. रणधीर शिंदे यांना जाहीर

May 7, 2026
ज्येष्ठ कवी, गीतकार माधव पवार यांचे निधन

ज्येष्ठ कवी, गीतकार माधव पवार यांचे निधन

May 7, 2026
रिजवान शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

रिजवान शेख यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

May 7, 2026
इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज घोलप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

इयत्ता नववीमध्ये 95.33% गुण मिळवून अधिराज घोलप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

May 7, 2026
डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग

डॉ. नितीन कदम सरांनी सांगितला करिअर निवडीचा शास्त्रशुद्ध मार्ग

May 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0851606

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697