सांगोला – तालुक्यातील ग्रामीण भागात नाझरा विद्यामंदिर अव्वल आहे. माझी संस्था व माझे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे गुणवत्तेत कसल्याही प्रकारची तडजोड नसते असे प्रतिपादन सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. ते नाझरा विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बिभिषण माने, सांगोला विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, माजी मुख्याध्यापक संजीव नाकील, उपमुख्याध्यापक सय्यद, सांगली जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक सपकाळ, पर्यवेक्षक विनायक पाटील उपस्थित होते.
कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव बिभीषण माने यांनी केला. यावेळी मार्गदर्शक शिक्षक गुरुदेव उजनीकर, सोमनाथ सपाटे, मंजुश्री ओतारी, शुभांगी नागरसे व विभाग प्रमुख महालिंग पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले. आभार दिलीप सरगर यांनी मानले.
या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान
कार्तिक शितोळे, ओमगोपाळ दीक्षित, सुजाता बाबर, प्रथमेश बाबर, सई मिसाळ, साक्षी सरगर, सोहम गिड्डे, आयुष कांबळे, श्रद्धा निंबाळकर, प्रथमेश केंगार, सुयश खांडेकर

























