Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोवर मंत्र्यांना जिल्हाबंदी, कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या एकीची ताकद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 18, 2024
in maharashtra
0
जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोवर मंत्र्यांना जिल्हाबंदी, कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या एकीची ताकद
0
SHARES
162
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून जोरदार विरोध केला आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शक्तीपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. जवळपास १२ जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. मात्र या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेतजमीन जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमीहिन होणार आहेत. काही शेतकरी तर या शेतीवरतीच अवलंबून आहेत. मात्र पिढीजात टिकवून ठेवलेली शेतजमीन एका क्षणात नाहीशी होणार असल्याने महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी याच शेतकऱ्यांनी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा विराट मोर्चाचे आयोजन केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ६ तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत मंत्र्यांना जिल्हा बंदी करणार, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीष फोंडे यांनी दिला. या आंदोलनाला कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेस नेते सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील तसेच शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी होते.

महाराष्ट्र सरकारने २८ फेब्रुवारी २०२४ व ७ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढून गोवा ते नागपूर असा ८०६ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे जाहीर केले आहे. याकरिता ४० हजार एकर जमीन संपादित केली जाणार असून ८६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या महामार्गास बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. राज्यातील कोणल्याही नागरिकांनी समूहाने किंवा संघटनेने या महामार्गाची मागणी केलेली नव्हती. तरीदेखील शेतकऱ्यांची चर्चा न करताच हा प्रकल्प रेटला गेला आहे.

शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे म्हणणे काय?

या महामार्गमध्ये संपादित होणारी जमीन ही बहुतांश बागायत आहे. पर्यावरण, जैवविविधता, जलस्त्रोत, भूजल पातळी, नदी, विहिरी, कालवे पाण्याच्या पाईपलाईन, शेती या सर्व गोष्टी या महामार्गामुळे नष्ट होणार आहेत. पर्यायी महामार्ग असताना हा महामार्ग केवळ कंत्राटदार रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मंत्री यांच्या संगनमताने लाभाच्या उद्देशाने तयार होत आहे. महाराष्ट्रात अगोदरच शेतीतील संकटामुळे दिवसाला 3 याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करत आहेत याबद्दल उपाययोजना करणे गरजेचे असताना सरकार शेतकऱ्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेत आहे. आम्ही एक इंच देखील जमीन या मार्गासाठी देणार नाही. शासनाने हा महामार्ग तात्काळ रद्द करावा. गेले तीन महिने हा महामार्ग रद्द करण्यासंदर्भातल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र शासन हे दररोज विविध वर्तमानपत्रांमध्ये अधिका-यांच्याकडून अधिसूचना जारी करत आहे याचा आम्ही निषेध करत आहोत, असे शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीष फोंडे यांनी सांगितले.

शक्तिपीठ महामार्ग आंदोलन

  • शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक
  • कोकणातील बांदा ते वर्धापर्यंत एकूण ८०५ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग
  • शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार
  • कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी, नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्तिपीठासह आदी देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग असणार
  • या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील २७ हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार
  • शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक
  • कोल्हापुरातल्या ६ तालुक्यातील ५९ गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार
  • ठेकेदारांची शक्ती वाढविण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप
Post Views: 94
Previous Post

मोठ्ठा आवाज ऐकू येताच रेल्वे रुळांच्या दिशेनं धावलो; स्थानिकांनी सांगितला मन हेलावून टाकणारा घटनाक्रम…

Next Post

रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; भारताच्या Playing XIमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; भारताच्या Playing XIमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार..

रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय; भारताच्या Playing XIमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार..

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962142

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!