Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2024
in top news
0
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे*
▪️सरसंघचालक डॉ. मोहन भागवत▪️
▪️वेद सेवकांचा सन्मान▪️

पुणे- “परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस
अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला.

बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सदगुरू ग्रुप पुणे तर्फे आयोजित वेदसेवक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, न्यासाचे महासचिव चंपतराय बन्सल, भारत विकास ग्रुपचे संस्थापक डॉ. हणमंतराव गायकवाड आणि सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले,”वेदांची भूमी असलेला भारत भाषा आणि पूजा पद्धतीच्या विविधतेने नटलेला आहे. आपले अस्तित्व वेगवेगळे दिसत असले, तरी आपण सर्व एकमेकांना बांधलेलो आहोत. खरं तर ही विविधता नसून, एकाच सत्याची अभिव्यक्ती आहे. सर्व जगाला सुख देण्याकरीताचे आपले राष्ट्रजीवन आहे.”

समाजात अनास्था वाढली असून, सांस्कृतिक मुल्यऱ्हासाचे बांगलादेश हे पहिलेच उदाहरण नसल्याचे भागवत यांनी सांगितले. ते म्हणाले, “या आधी अमेरिका, पोलंड आणि अरब राष्ट्रांनी हे अनुभवले आहे. समाजात कलहाची आग लावून, स्वार्थाची पोळी भाजण्याऱ्या मधांद शक्ती भारतात आल्या असून, आपल्या ज्ञानातूनच त्याची उत्तरक्रिया करावी लागेल. त्यासाठी आपले स्वचे ज्ञान जागृत करत, परंपरेचे आणि संविधानाचे अनुशासन पाळले पाहीजे.”

गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, “लालसेपोटी कर्मकांडे किंवा अनुष्ठाने केली जातात, असा समज आहे. पण तुम्ही तो मोडीत काढला. भगवंताच्या भजनाबरोबरच समाजाच्या सेवेचे कार्य आणि सज्जनांचे संघठन करणे आवश्यक आहे. काहीही न घेता समाजाकरता, राष्ट्रासाठी झटणे आणि देशासाठी अर्पण करणे हे मुख्य ब्राह्मण्यत्व आहे. समाज घडविण्याचे कार्य त्यांनी करावे. श्रीरामाची स्थापना झाली मात्र रामराज्याची स्थापना अजून व्हायची आहे. रामराज्याशिवाय सगळीकडे सूख नांदणार आहे. माऊलींचे पसायदान हा रामराज्याचा जाहीरनामा आहे.”

यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले,”राममंदिर पुनर्निर्माणासाठी चारही वेदांचे अनुष्ठान करण्यात आले. येत्या काळात वेदपाठशाळा आणि शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरु होणार आहे.” अभिजित पवार यांनी अध्यात्म आणि विज्ञानाच्या अनुभूतीच्या जोरावर सांगड मांडली. तसेच रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यात सहभागी २४० पुरोहितांना प्रत्येकी एक लाखाची दक्षिणा जाहीर केली. तळागाळातील नागरिकांसाठी भारत विकास ग्रुपची स्थापना आणि वाटचाल हा प्रवास यावेळी हणमंतराव गायकवाड यांनी उलगडला. कार्यक्रमात ‘संकल्प ते सिद्धी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय उपाध्ये यांनी केले.

– अयोध्येत निषादराज आणि शबरीचे मंदिर
अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरात श्रीरामांच्या समकालीन ऋषी आणि संतांचे १८ मंदिरे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती चंपतराय यांनी दिली. श्रीरामलल्लाचे पाच वर्षाचे वय आणि ५१ इंचाच्या मुर्ती मागील विज्ञान त्यांनी उलगडले.

अयोध्यातील मंदिर बांधकामाची सद्यस्थिती आणि भविष्यातील कामांची माहिती त्यांनी दिली. चंपतराय म्हणाले, “महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, अगस्ती ऋषी यांसह निषादराज, शबरीमाता, अहिल्या, जटायू आणि तुलसीदासांचे मंदिर निर्माण होणार आहे. सध्या मंदिर परिसरात दहा हजार नागरिकांची व्यवस्था आहे. पुढील दोन वर्षानंतर २५ हजार भाविकांची व्यवस्था होईल. तसेच पर्यावरणपूरक आणि झिरो डिस्चार्जची व्यवस्था मंदिर परिसरात असेल.”असेही ते म्हणाले.
—————–

Post Views: 38
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ अर्धा किलोमीटर रस्त्यावर विजेचे खांब

Next Post

सोयगाव; गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात पोलीसांचा रूट मार्च;शांततेचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोयगाव; गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात पोलीसांचा रूट मार्च;शांततेचे आवाहन

सोयगाव; गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर सोयगाव शहरात पोलीसांचा रूट मार्च;शांततेचे आवाहन

ताज्या बातम्या

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026
आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

July 28, 2026

तीनदा बदली, सुट्टीच्या दिवशी आदेश; आरोग्य विभागातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

July 28, 2026

अधिकार नसताना बिलांचा व्यवहार; ग्रामसेवक निलंबित

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007935

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!