सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यु बुधवार पेठेतील मंत्री चंडक कॉम्प्लेक्समधील गणेश मंदिर परिसरात रविवारी (दि. २) सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रभागाचे नूतन नगरसेवक गौतम कसबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री चंडक कॉम्प्लेक्सचे चेअरमन ॲड. संजीव सदाफुले यांच्या हस्ते नगरसेवक गौतम कसबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सदाफुले यांनी कॉम्प्लेक्समधील प्रलंबित नागरी सुविधा व विकासकामांचा आढावा मांडत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावर नगरसेवक गौतम कसबे यांनी संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक नागरी सुविधा व विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष अमोल सावंत, कोषाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, शैलेंद्र सोनकांबळे, सुनके, महाकाळ, राजेंद्र आगरकर, रत्नदीप कांबळे, अरुण भालेराव, नुले, चित्तरंजन सातपुते, प्रा. धनंजय शहा, ॲड. सिद्धांत सदाफुले, अश्विन सोनवणे, राजू नारायणकर, श्रीनिवास कसबे यांच्यासह कॉम्प्लेक्समधील अनेक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन आबुटे, सुनके, अभिमन्यू शिंदे आणि शाम शिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिमन्यू शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 6