सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड, लखन गायकवाड, विश्वेश्वर गायकवाड, सूर्यकांत केंदळे, मंडळाचे अध्यक्ष सुजित जरीपटके आदींचे उपस्थिती होती.
यावेळी सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाचे क्रांतिकारी शस्त्र आहे. तळागाळातील माणसाला यातून विद्रोह करण्यासाठी बळ मिळते. लढण्यास प्रेरणा मिळते.यावेळी लखन गायकवाड, सूर्यकांत केंद्रे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दादा जोगदंड, सुरज डोलारे, मुकेश गायकवाड, ऋषिकेश रणदिवे,अभिषेक हटकर ओमकार पाटोळे शुभम पारदे अक्षय गायकवाड, दत्ता गायकवाड, अमोल केंदळे, महेश तेजबिदे, आदित्य पारधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 22