सोलापूर – अनैतिक संबंधाच्या कारणावरून झोपेत असलेल्या एका 24 वर्षीय अविवाहित तरुणाचा तीक्ष्णशस्त्राने वार करून खून करण्यात आला.ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे आज रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी वळसंग पोलिसांनी मृताच्या दोघां नातेवाईकांना अटक केली आहे.
सचिन अभिमन्यू सासवे (वय 24 वर्ष, रा.आहेरवाडी ता.दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.मयत सचिन सासवे हा विवाहित असून तो मजुरी आणि शेती करीत होता.तो नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री शेतातील वस्तीवर झोपला होता. आणि आज रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. ही खबर वळसंग पोलीस ठाण्याला समजताच फौजदार आर कांबळे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी ११ वाजता दाखल केला.
चौकट – खून प्रकरणी दोघा आरोपींना अटक
दरम्यान मयत सचिन याचे वडील अभिमन्यू सासवे (रा.आहेरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वळसंग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी धोंडीबा क्षेत्री (वय 42) आणि त्याचा मुलगा आयुष धोंडीबा क्षेत्री (वय19 दोघे रा. आहेरवाडी) या दोघांना अटक केली.मयताचे अनैतिक संबंध होते.त्यातून खून झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .