सोलापूर : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मृत व अपघातात जखमी झालेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत वितरित करण्यात येत आहे. या योजनेतून मृत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार तसेच अपघातात जखमी झालेल्या कामगारांना त्यांच्या अपघाताच्या स्वरूपानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या अंतर्गत असलेल्या तसेच महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील स्थलांतरित ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या कुटुंबांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो.
या योजनेंतर्गत ऊसतोड कामगारांचा मृत्यू, अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व अथवा अपघातामुळे अंगभूत झालेल्या जखमा, ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या वारसांना तसेच त्यांच्या कुटुंबांना अनुदान वितरित करण्यात येते. यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना अपघाताच्या स्वरूपानुसार सानुग्रह अनुदान देण्यात येते.
सन २०२६-२७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व बेल्डेझोली/वाहतूक कामगार यांच्या अपघातानुसार एकूण २२ प्रस्तावांना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांच्याकडून रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यासाठी संबंधित प्रस्तावांना रु. ४५,१६,१६१/-(पाच कोटी ४५ लाख १६ हजार १६१) इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात ६ लाभार्थ्यांना अनुदान आदेश वितरित करण्यात आले. यावेळी उर्वरित लाभार्थ्यांना डी.बी.टी.द्वारे बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
*****
Views: 54