अकलूज माळशिरस तालुक्यात रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने शंभर एकरावर डाळिंब,ऊस आणि केळी पिकांवर संशोधन करून एकरी उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवणेत येणार आहेत व तालुक्यातील विविध भागात हे प्रात्यक्षिक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत असे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या युपीएल कंपनीचे मालक वरून श्रॉफ यांनी सांगितले
पाऊसमान अत्यंत कमी असल्यामुळे पूर्वी मकेवर आढळणारी कोळीफॉल आर्मी वर्म ही कीड आता उसाकडे परावर्तित होत आहे .त्याशिवाय इतर किडींचा उसावर प्रादुर्भाव आढळत आहे .त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारीवर मोठे संकट येणार आहे .केळीवरील चिलींग ,डाळिंबावरील तेल्या व मररोग अशा विविध शेती संकटाचाअभ्यास करून त्यावर उपाय शोधण्याचे काम केले जाईल असे असे मत युपीएल या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीचे मालक वरून श्रॉफ यांनी सांगितले .मक्याच्या स्टार्चपासून या कंपनीने बनवलेले खत पाणी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे श्रॉप यांनी सांगितले .
माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांच्या पुढाकारातून अकलूज येथे शेतीच्या विविध किडी व समस्यांबद्दल परिसंवाद व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जगात ४० देशांमध्ये शेती क्षेत्रात संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या यूपीएल कंपनीचे मालक वरून श्रॉफ तसेच या कंपनीचे हर्षल सोनपले , जितेंद्र गोरडे , अमोल अधाळे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली यावेळी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली .या चर्चासत्रासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील ,माजी खासदार रणजितसिंह मोहिते -पाटील ,जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते -पाटील ,सभापती दत्ता मगर यांच्यासह कृषी खात्याचे अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
लोणीकंद या ठिकाणी कंपनीचे प्रशिक्षण केंद्र असून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे . ही कंपनी कार्बन क्रेडिट क्षेत्रातही काम करत आहे .
शेतीमध्ये विविध पिकांसाठी कराव्या लागणाऱ्या मशागती ,खत , पाणी ,पिक व औषधांचे व्यवस्थापन ,पीक पद्धती , बुरशीजन्य व कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावे लागणारे उपाय या सर्व शेतीविषयक घटकांवर सखोल चर्चा व संवाद झाला .प्रामुख्याने ऊस केळी आणि डाळिंब या पिकांबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका व हवे असलेले मार्गदर्शन या परिसंवादात झाले .येथे उपस्थित झालेल्या प्रश्नांवर कोणत्या प्रकारचे उपाय काढता येतील त्यासाठी शेतकऱ्यांची निवड करून अभ्यास गट तयार करून पुढील दोन-तीन महिन्यात पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे वरून श्रॉफ यांनी सांगितले .
चौकट :
सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात आज अखेर पाऊस नसल्यातच जमा आहे त्यामुळे मकेवर आढळणारी कीड आता उसावर परावर्तित होत आहे . त्याशिवाय शेंडेकीड , कांडिकिड , खोडकीड , हुमनी ,रस शोषक पायरीला या किडीचा आता उद्रेक व्हायला लागला आहे .अशा परिस्थितीत ऊस शेतीचे त्याशिवाय केळी आणि डाळिंब शेतीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात या चर्चासत्रात विचारांची सविस्तर देवाणघेवाण झाली .परिसंवाद व चर्चा सत्राच्या आधी परिसरातील केळी डाळिंब ऊस शेतीच्या शिवारात पाहणी दौरा देखील झाला .
Post Views: 22