पिलीव – मोबाईल, सोशल मिडीया आणी बदलती जीवनशैली यामुळे तरुणाईच्या हातात जग आले असले तरी या आधुनिकतेच्या काळात दिवसेंदिवस तरुण _ तरुणी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत ही बाब समाजासाठी अतिशय चिंताजनक आहे.खरेतर निर्जन ठिकाणे ,घाट, बंद इमारती याचा आडोसा याचा यासाठी उपयोग होत आहे .शहरात शिक्षणासाठी असणारे तरुण _ तरुणी यामुळे खरेतर शहरातील हे फयाड आता खेडेगापर्यत पोहचले आहे.यामुळे सध्या ग्रामीण भागात सुद्धा तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे.तरुणाई वेगवेगळी इंजेक्शन, व्हायटनर, अमली पदार्थ, मदय, गुटखा, मावा ,गांजा ,दारु ,मोठ्या प्रमाणात स्टींग पिणे अश्या विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी तरुणाई जात आहे .याला आवर घालण्याचे पालकांसमोर मोठे आव्हान आहे .सुरुवातीला हे तरुण केवळ मौजमजेसाठी किंवा मिञांचया आग्रहाखातर केलेला प्रयोग नंतर व्यसनाच्या आहारी जाण्यापर्यत पोहचातात यामुळे शिक्षण, करिअर, व्यवसाय, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक जीवनावर याचा गंभीर परिणाम होतोय. मोबाईलचा वापर ,पालकांच्या डोळ्यात धुळफेक ___ स्मार्टफोन, व सोशल मिडीया हे तरुणाचे दोन अविभाज्य घटक झाले आहेत. यामुळे मिञ _ मैञीणीबरोबर तासनतास चॅटिंग, खाजगी ग्रुप, सोशल मिडीया वाॅटसप, इनटाँग्राम, मेसेंजर, फेसबुक, यावरुन मिञ मैञीणीबरोबर कायम संपर्कात. तासनतास याचा वापर यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.यावर आवर कसा घालायचा हा पालकासमोरील मोठे आव्हान आहे.कारण पालक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात .यामुळे मुलांना पुर्ण मोकळीक असते .खरेतर पालकांनी मुलाच्या मिञ मैञीणी,दैनंदिन दिनक्रम, वाढलेला खर्च, मोबाईल वापरण्याच्या पद्धती याकडे पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे . भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्याची आवश्यकता _ तरुण हा देशाची व समाजाची मोठी ताकद आहे.माञ हीच तरुणाई जर व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कौटुंबिक व सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते.पालकांनी संवाद, विश्वास व संस्कार याचा आधार घेत तरुणाईला व्यसनापासून दुर ठेवणे आवश्यक आहे.तरुणाईला पालक, शिक्षक, पोलीस, व समाजातील घटकाने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सोशल मिडीया व नशा यामुळे प्रेमप्रकरणे व गुन्हेगारी प्रवृतीत मोठ्या प्रमाणावर वाढ_ _ सोशल मिडीयाचा अमर्याद वापर ,व्यसनाधीनता यामुळे अलीकडे शाळा, काॅलेज मधील मुले किंवा इतर तरुणाई यांच्यामध्ये सोशल मिडीयामुळे जवळीकता वाढत चालली असुन यामुळे प्रेमप्रकरणात वाढ होत असुन यामुळे कसलाही विचार न तरुण _ तरुणी पळुन जाण्याचे प्रमाण वरचेवर वाढतच चालले आहे .ही बाब सुद्धा समाजात पालकांसाठी दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे.पण समाजात आपली इज्जत जाईल म्हणून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमीच आहे.तर व्यसनाधीनतेमुळे वरचेवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. कठोर निर्णयाऐवजी पालक _ मुलगा यांच्यामध्ये सुसंवाद महत्वाचा _ तरुणावर सतत संशय घेणे चुकीचे आहे.केवळ ओरडत बसुन पण काहीच फायदा नाही .तरुणांना खरेतर मिञत्वाचया नात्याने वागणे .त्यांना नशेचे दुष्परिणाम समजावून सांगणे महत्वाचे आहे. * पोलीस प्रशासन व समाजाची भुमीका महत्वाची * .खरेतर नशेचे पदार्थ विकणारे ,अल्पवयीन मुलांना नशेच्या विळख्यात ओढणारे व नशेचे पदार्थ विकणारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.निर्जन ठिकाणे, घाटमाथे, किंवा डोंगर माथे, उंच टेकडया, वनविभाग याठिकाणी पोलीसांनी गस्त घालणे आवश्यक आहे .तसेच पोलीस प्रशासनाने थोडा कारवाईचा बडगा उगारलयाशिवाय तरुणाई नशेच्या विळख्यातुन सुटणारच नाही . सोशल मिडीयाचा अमर्याद वापर, ग्रामीण भागातील तरुण _ तरुणी शहरातील जिवन पद्धतीचा अवलंब करीत आहे.सोशल मिडीयावरील आकर्षक जाहिराती यामुळे तरुणाई नशेच्या विळख्यात पडुन आपल्या शरीराची बरबादी तर करीत आहेच पण आपल्या उज्ज्वल भविष्याचा कसलाच विचार न करता स्वतच्या हातानेच आपले जिवन संपवित आहेत. सध्या पालकांसमोर आपल्या तरुणाला व्यसनाच्या विळख्यातुन बाहेर काढणे हे एक न पेलणारे मोठे आव्हान झाले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















