सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवार यांना ‘मानद कर्नल’ (Honorary Rank of Colonel) हा प्रतिष्ठित किताब सोमवारी प्रदान करण्यात येईल.
उच्च शिक्षणातील त्यांचे नेतृत्व, समर्पण आणि एनसीसीच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती व शिस्त रुजवण्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान जाहीर झाला आहे. या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन सोमवारी १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या नवीन इमारतीमधील ‘अहिल्याभवन’ सभागृहात करण्यात आले आहे. हा सन्मान एनसीसी ग्रुप पुणेचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर एस.पी.एस. रौतेला यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असून, या स्मरणीय सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी केले आहे.
——






















