Thursday, May 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यघटनेची मूळ प्रत मुलांना बघायला मिळू शकत नाही, याची खंत – उपराष्ट्रपती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 25, 2024
in india
0
राज्यघटनेची मूळ प्रत मुलांना बघायला मिळू शकत नाही, याची खंत – उपराष्ट्रपती
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या राज्यघटनेची मूळ प्रत आपल्या मुलांना बघायला मिळू शकत नाही, याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खंत व्यक्त केली आहे. या मूळ दस्तऐवजात राम, कृष्ण आणि बुद्ध आदी 22 लघुचित्रे आहेत, ज्यांना घटनेच्या प्रत्येक भागाच्या वर विचारपूर्वक स्थान दिले आहे, या लघुचित्रांच्या माध्यमातून घटनाकर्त्यांनी आपल्या पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे सार व्यक्त केले आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. मात्र ते पुस्तकाचा भाग नसल्यामुळे आपण पाहू शकत नाही. मात्र केंद्रीय कायदा मंत्री, घटनाकर्त्यांनी आपल्याला प्रदान केलेले संविधान, त्याच्या मूळ स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रजासत्ताक भारताचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते, ‘हमारा संविधान, हमारा सम्मान’ अभियानाचा प्रारंभ झाला.

मूलभूत अधिकार हे आपल्या लोकशाहीचे सार आहे आणि लोकशाहीच्या मूल्यांचा अविभाज्य भाग आहेत, असे त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला मूलभूत अधिकार मिळत नसतील तर आपण लोकशाही व्यवस्थेत राहत असल्याचा दावा करू शकत नाही, हे अधोरेखित करून उपराष्ट्रपती म्हणाले की राज्यघटनेच्या या भागात आपल्याकडे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे अयोध्येत परतलेले लघुचित्र आहे.

अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे एक ऐतिहासिक क्षण होता, “नियतीकडून आधुनिकतेकडे जाण्याचा प्रवास (GST) केल्यानंतर, आपण 22 जानेवारी 2024 रोजी दिव्यत्वाकडे जाण्याचा प्रवास केला.” असे त्यांनी सांगितले.

जेव्हा लोक त्यांच्या घटनात्मक कर्तव्यात अपयशी ठरतात तेव्हा खेद वाटू शकत नाही असे सांगून, संवैधानिक पदे भूषवणार्यांना कोणतीही सबब चालू शकत नाही आणि त्यांना घटनेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवावाच लागतो असे त्यांनी अधोरेखित केले.

मूलभूत कर्तव्य हा संविधानाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपापली मूलभूत कर्तव्य पार पाडावीत असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. हे करत असताना कोणताही खर्च तर येत नाही शिवाय एक उत्तम नागरिक म्हणून आपली जडणघडण होते, असे ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक घटकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावे असे सांगून ते म्हणाले की या झपाट्याने बदलणाऱ्या जगात कायदेमंडळ, कार्यकारी यंत्रणा आणि न्यायपालिका यांच्यातप्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

या कार्यक्रमाला विधी आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल आणि महाधिवक्ता आर.वेंकटरामनी, न्याय विभागाचे सचिव एस के जी रहाटे, इग्नू चे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 82
Previous Post

वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड : मुनगंटीवार

Next Post

राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

वृद्ध इसमाचा मृत्यू  – मजुराची गळफासाने आत्महत्या – औषध पिलेल्या इसमाचा मृत्यू

May 20, 2026

पाहणी पूर्ण, आता गुणांकनाची कसोटी; ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये गावागावात उत्सुकता

May 20, 2026

अक्कलकोट तालुक्यात रानडुकराचा हैदोस – हल्ल्यात तीन शेतकरी जखमी 

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0873350

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697