सोलापूर – निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी (एनजीसीए )आयोजित इंटर क्लब लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत १२ व १४ वर्षांखालील वयोगटात ‘ वॉरियर्स’ संघाने, तर १६ वर्षांखालील वयोगटात ‘ईगल्स’ संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात विजेतेपद पटकावले.
डोणगाव रोडवरील पुष्प जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत १२ व १४ वर्षांखालील गटात ‘वॉरियर्स’ संघाने ‘पँथर्स’ संघावर ५ गडी राखून विजय मिळविला. दुसऱ्या सोळा वर्षाखालील गटातील अंतिम सामन्यात ‘ईगल्स’ने ‘किंग्स’ संघावर ३ धावांनी मात केली.
पारितोषिक वितरण समारंभ स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक अनिकेत फळे व प्रबंधक धनंजय होनमाने यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुदेश मालप, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी विनोद पाटील, एनआरएमयूचे संघटक नेते मनोज वाल्मिकी, युवा काँग्रेसचे नेते राहुल म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सर्वगोड, शिवाजी नाईट कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. वाल्मीक कीर्तीकर आणि श्री. शेख आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक सुरवसे, आनंद पाटील आणि अविनाश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲकॅडमीचे संचालक निलेश गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन विष्णू गायकवाड सर यांनी केले. उपस्थितांचे आभार गणेश पवार यांनी मानले.
——–
अंतिम सामन्यांचे संक्षिप्त धावफलक
१२ व १४ वर्षांखालील : पँथर्स: २५ षटकांत ५ बाद ११३ धावा. (कबीर कीर्तीकर ४४, श्रेयश शितळ १६, आदिराज कोनापुरे १२. गोलंदाजी: आदित्य चटके २/१७, विराज टकले व यशराज टेकाळे प्रत्येकी १ बळी).
पराभूत विरुद्ध वॉरियर्स: २४.२ षटकांत ५ बाद ११७ धावा. (आदित्य चटके नाबाद २२, दुर्वांक पाटील २०, आदित्य सुरवसे १२, विराज टकले १०, नकुल होनमाने ८. गोलंदाजी: श्रीकार चव्हाण २/२७, शांभवी शिंदकर व अथर्व पाटील प्रत्येकी १ बळी).
१६ वर्षाखालील : ईगल्स: २६.४ षटकांत सर्वबाद १६२ धावा. (सोहम कुलकर्णी ४०, ऋग्वेद पाटील ३०, श्रवण म्हेत्रे २५, आर्यन हांगे १८. गोलंदाजी: श्रवण माळी व आनंद शेंडे प्रत्येकी ३ बळी, अभिजीत सरवदे २/१७, अर्जुन चटके १/१७). विजयी विरुद्ध किंग्स: २५.३ षटकांत सर्वबाद १५९ धावा. (आनंद शेंडे ५८, विराज पांढरे नाबाद २८, अभिजीत सरवदे २७. गोलंदाजी: अनुज वाल्मिकी व चेतन मांडलो प्रत्येकी ३ बळी, ऋग्वेद पाटील व सोहम कुलकर्णी प्रत्येकी १ बळी).























