उद्धव नगर परिसरातील श्री जनार्दन प्रभाकर वाघमारे यांच्या घरात दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, पर्यावरणीय व वास्तव चित्रमय देखावा सादर करण्यात येते. तर यावर्षी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे देखावा सादर करण्यात आले. हर घर साक्षर या संकल्पनेप्रमाणे पंधरा वर्षे व त्यापुढील अधिक वय असणाऱ्या असाक्षराना साक्षर बनवणे हे उदिष्ट लक्षात घेऊन त्याचा देखावा सादर करण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे.या चित्रमय देखावा निर्मिती सादरीकरणासाठी वैष्णवी वाघमारे, अजिंक्य वाघमारे, अबोली कोरे,अनुष्का कोरे व ज्ञानेश्वरी कोरे यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 7