सांगोला – नगरपरिषद हद्दीतील पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे, त्याठिकाणी आता रस्त्यांच्या खडीकरणाचे काम चालू झाले असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने यांनी दिली.
दरम्यान ७२ लाख रूपयांच्या खडीकरणाच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन माजी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती गोदाबाई बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती छाया मेटकरी, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, नगरसेविका आशा यावलकर, सीमा सरगर, दिव्याणी दौंडे, अनिता केदार, नगर अभियंता किरण काळे, अनिल भद्रे, इंजि.मोईन इनामदार, संजय दौंडे यांच्या उपस्थितीत झाले.
यामध्ये सांगोला शहरातील कर्मवीर नगर नं.५ येथे वासूद रोड ते मकरंद जवंजाळ घर ते रविकांत मराळ घर ते सदाशिव पुजारी घरापर्यंत, दत्तनगर येथे वासूद रोड ते शिवाजी भोसले घर ते म्हेत्रे बिल्डींग ते वाघमारे घरापर्यंत, सदानंद नगर येथे वासूद रोड ते प्रविण मोहिते घर ते संजय चौगुले घर ते मणेरी घरापर्यंत, विद्यानगर येथे पंढरपूर रोड ते घोंगडे घर ते काटकर घर ते विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम शाळेपर्यंत, फुले चौक येथे, मिरज पंढरपूर हायवे ते अलराईन नगर येथे मुल्ला घर ते तांबोळी किराणा दुकानापर्यंत, मिरज रोड ते सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलपर्यंत रस्ता ते कांबळे घरापर्यंत, यशनगर येथे लवटे हॉस्पिटल ते खुळपे घरापर्यंत, वाढेगांव वेस येथे, कडलास रोड ते पारे रस्ता बालाजी टाईल्सच्या पाठीमागे ही रस्ता खडीकरण करणे कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.
























