पंढरपूर – येथील कॉरिडॉर नगरसेवक व नागरिकांना विश्वासात घेऊन करावा याबाबत नगरसेवक राहुल शिंदे-नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने पंढरपुरात कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात चौफाळा ते महाद्वार घाट पर्यंत कॉरिडॉर करण्यात येणार आहे.
यामुळे ६५० मालमत्ता बाधित होणार आहेत. कॉरिडॉर मुळे मंदिर परिसरातील व्यापारी व नागरिकांनी विरोध दर्शवला आहे कॉरिडॉर होऊ नये यासाठी तीर्थ बचाव समितीची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात येत आहेत.
शासनाने कॉरिडोर करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र कॉरिडॉर करण्याबाबत नगरसेवक व नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात येत नाही. यामुळे कॉरिडॉर बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणून कॉरिडॉर बाबतची माहिती नगरसेवक व नागरिकांना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरसेवक राहुल-शिंदे नाईक यांनी निवेदन दिले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन कोणावरही अन्याय न होता पंढरपूरला जागतिक दर्जाचे तिर्थक्षेत्र करणार असल्याचे सांगितले.

























