Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरच्या इतिहासात कोरला डॉ. बाबासाहेबांचा स्वाभिमानाचा सुवर्णअध्याय

तरुण भारतbyतरुण भारत
April 14, 2026
in editor
0
सोलापूरच्या इतिहासात कोरला डॉ. बाबासाहेबांचा स्वाभिमानाचा सुवर्णअध्याय
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापुराशी अतूट ऋणानुबंध असून त्यांच्या प्रत्येक भेटीने या नगरीला सामाजिक व वैचारिक क्रांतीची नवी दिशा दिली. शहर व जिल्ह्याला वारंवार लाभलेल्या त्यांच्या पदस्पर्शामुळे सोलापूरची ओळख परिवर्तनवादी विचारांच्या केंद्रस्थानी निर्माण झाली. त्यांनी उपस्थित राहिलेल्या परिषद, मानपत्र सोहळे आणि प्रभावी भाषणांमधून सोलापूरकरांना स्वाभिमान, संघटन आणि स्वावलंबनाचा मूलमंत्र दिला. “तुमच्या मताची किंमत मिठ-मिरचीसारखी समजू नका” आणि “स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा” हा त्यांचा प्रेरक संदेश आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे.

            प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापुरशी अतुट ऋणानुबंध होता. शहर – जिल्ह्याला अनेकवेळा डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचा पदस्पर्श लाभला. भारतरत्न डॉ. आंबेडकर ज्या-ज्या वेळी सोलापुरला आले त्यावेळी झालेल्या परिषदा, मानपत्र सोहळा, भाषणे या सर्व क्रांतीकारक घटना सोलापूरकरांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या.तुमच्या मताची किंमत मिठ-मिरची, सारखी समजू नका !, स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा !!, असा प्रेरक संदेश त्यांनी दिला. 

         विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकवेळा सोलापूर जिल्ह्यात आले. त्या दरम्यान साधारणतः १४ विविध कार्यक्रम पार पडले. १ जानेवारी १९२५ मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेने डॉ. आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मिलिंद नगरात पहिल्या वसतिगृहाची स्थापना केली होती. बार्शी येथे देशांतर – नामांतर की धर्मांतर १ मे १९२४ मध्ये बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने परिषद झाली. या परिषदेत देशांतर-नामांतर की धर्मातर यावर महत्त्वपूर्ण भाष्य करीत धर्मांतराचा संकल्प आंबेडकर यांनी बार्शी येथे केला. धर्मांतराबाबतचे चिंतन त्यांनी व्यक्त केले होते.

       दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी सोलापूर शहरात थोरला राजवाडा (मिलिंद नगर) येथे सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब उपस्थित होते. स्वतःच्या पायावर उभे राहून सर्वागीण उन्नती करा, स्वतंत्र व्हा, स्वतंत्र वसाहती निर्माण करुन निर्भयपणे जगण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मांतराचा ठरावही केला होता. ६ मार्च १९३२ रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे स्पृश्य व अस्पृश्य मंडळींसमोर डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी भाषण झाले होते. भारतीय गोलमेज परिषदेच्या मतदार कमिटीची स्पेशल गाडी सोलापूर स्टेशनवर आल्यानंतर स्टेशन बाहेर जमलेल्या जनसमुदायाच्या आग्रहास्तव बाहेर येऊन त्यांनी मार्गदर्शन केले होते.

        करकंब येथे ३१ डिसेंबर १९३७ रोजी मातंग समाजापुढे भाषण झाले. जातीभेद ही वरुन वाहत आलेली गटारगंगा असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे ३१ डिसेंबर १९३७ रोजी जिल्हा राजकीय परिषद झाली. त्यात त्यांनी जुलूमांविरुद्ध प्रतिकार करण्याचा संदेश दिला. निर्भय होण्याचे आवाहन केले.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दि. २४ एप्रिल १९३७ रोजी या ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांनी चांदीच्या ग्लासामधून पाणी वर काढून या विहिरीचे उद्घाटन केले होते. सोलापुरातील धाकटा राजवाडा येथेही त्यांनी भेट दिली होती.

         त्यानंतर आंबेडकर हे १ जानेवारी १९३८ रोजी सोलापुरात आले होते. नव्या वर्षाच्या दिवशीच सोलापुरात त्यांनी हिंदी ख्रिस्ती समाजाला मागदर्शन केले होते. सोलापूर नगरपालिकेच्या वतीने डॉ. आंबेडकरांना मानपत्र प्रदान करण्यात आले होते. 

       दरम्यान, कसबे – तडवळे (ढोकी) येथे २३ फेब्रुवारी १९४१ रोजी वतनदार महार-मांग परिषदे डॉ. बाबासाहेब उपस्थित होते. कॉंग्रेसपासून सावध रहा, असे आवाहन करतानाच त्यांनी त्यावेळी आपला संसार आपणच केला पाहिजे. सन्मानाने जगण्यासाठी राजकीय हक्काची सत्ता आपल्या हाती पाहिजे, असा मूलमंत्र दिला होता. 

        सोलापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने दोनवेळा आणि अस्पृश्य जनतेतर्फे एकदा असे तीन वेळा डॉ.बाबासाहेबांना धाटात मानपत्र अर्पण करण्यात आले होते.  सोलापुरात थोरला राजवाडा येथे २४ मे १९३२ रोजी तत्कालिन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. बेंच मॅजिस्ट्रेट पापय्या बाबाजी बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. भागवत चित्र मंदिर येथे १ जानेवारी १९३८ रोजी नगरपालिकेच्या वतीने रावबहादूर डॉ. व्ही. व्ही मुळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. हरिभाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा.ब. मुळे स्मारक मंदिरात दि. १४ जानेवारी १९४६ रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले.

तीन ऐतिहासिक भेटींचा 

साक्षीदार थोरला राजवाडा

सोलापुरात थोरला राजवाडा येथे 

तीन वेळा डॉ. आंबेडकरांची भेट लाभली. 

दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी सोलापूर शहरात थोरला राजवाडा (मिलिंद नगर) येथे सोलापूर जिल्हा महार वतनदार परिषदेचे दुसऱ्या अधिवेशनासाठी डॉ. आंबेडकर आले होते. २४ मे १९३२ रोजी तत्कालिन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी १९३७ रोजी मुंबई लेजिस्लेटीव्ह असेम्ब्ली निवडणुकी निमित्त डॉ. आंबेडकर सोलापुरात आले होते. थोरला राजवाडा येथील मंडपात त्यांचे भाषण झाले.

बावीतील मुक्काम ठरला ऐतिहासिक 

जानेवारी १९२५ मध्ये माता रमाई यांची प्रकृती खालावली होती. हवा पालट म्हणून तेव्हा डॉ. बाबासाहेब सहकुटुंब माढा तालुक्यातील बावी येथे मुक्कामी आले होते. समाज सुधारक वालचंद कोठारी यांच्या मळ्यात ते काही दिवस राहिले होते.

सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ 

सोलापुरात रोवली

हरिमाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात दिनांक १४ जानेवारी १९४६ रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. “सार्वजनिक कार्याची मुहुर्तमेढ सोलापूरात मी रोवली”, असे डॉ. आंबेडकरांनी त्यावेळी अभिमानाने सांगितले. मजूरमंत्री या नात्याने मजुरांच्या हिताकडे अधिक लक्ष देत आहे. मजुरांच्या हिताचे १० कायदे करीत आहोत, ज्यामुळे देशाचे सामाजिक व आर्थिक दारिद्रय दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. बडबड करण्यापेक्षा कृतीला महत्त्व असल्याचे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.

तुमच्या मताची किंमत 

मिठ-मिरची सारखी समजू नका !

        २४ जानेवारी १९३७ रोजी मुंबई लेजिस्लेटीव्ह असेम्ब्ली निवडणुकी निमित्त डॉ. आंबेडकर सोलापुरात आले होते. थोरला राजवाडा येथील मंडपात त्यांचे भाषण झाले. तुमच्या मताची किंमत मिठ-मिरची, सारखी समजू नका, तुमच्या प्राणा इतकीच किंबहुना त्याहुन जास्त तुमच्या मताची किंमत आहे, हे विसरु नका, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले होते.

Post Views: 66
Previous Post

पंढरपूर कॉरिडॉर करताना बाधितांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा – नगरसेवक राहुल शिंदे-नाईक

Next Post

अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने स्वत:वरच अँसिड ओतून घेतल्याची माहिती आली पुढे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने स्वत:वरच अँसिड ओतून घेतल्याची माहिती आली पुढे

अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीने स्वत:वरच अँसिड ओतून घेतल्याची माहिती आली पुढे

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244865

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!