पंढरपूर – एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथे इंनोवेशन क्लब आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘डीप लर्निंगची मूलभूत तत्त्वे आणि उपयोग’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीप लर्निंगच्या मूलभूत तत्त्वांची, कार्यपद्धतीची तसेच विविध क्षेत्रांमध्ये डीप लर्निंगच्या होणाऱ्या उपयोगांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक जगताप यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना डीप लर्निंगची मूलभूत तत्त्वे, विविध तंत्रे, कार्यपद्धती तसेच त्याचे विविध व्यावहारिक उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
इंनोवेशन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन संधींची माहिती मिळावी, यासाठी विविध व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद आणि तांत्रिक उपक्रमांचे नियमितपणे आयोजन केले जाते.
या कार्यशाळेचे आयोजन इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक तसेच इंनोवेशन क्लब प्रमुख प्रा. वैष्णवी उत्पात आणि प्रा. माधव नाईकनवरे तसेच इंनोवेशन क्लब च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना डीप लर्निंगची मूलभूत तत्त्वे आणि विविध क्षेत्रांतील त्याचे उपयोग याबाबत माहिती मिळून त्यांच्या तांत्रिक ज्ञानात आणि कौशल्यात निश्चितच भर पडली.
Post Views: 22