सोलापूर – “मुलांच्या क्रिकेट करिअरला पाठबळ देत असतानाच, पालकांनी आपल्या पाल्याचा शैक्षणिक किंवा पर्यायी ‘बी प्लॅन’ देखील तयार ठेवावा, जेणेकरून भविष्यात त्यांना त्याचा मोठा फायदा होईल,” असे १४ वर्षांखालील वयोगट निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे
पालकांनी आपल्या पाल्याचे क्रिकेटमधील करिअर कसे घडवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने विशेष ‘पालक शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. माणिक चौक येथील सात्विक हॉलमध्ये हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.

जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेबर्सो यांनी जिल्हा पातळीवर खेळाडूंची निवड कशी होते, याची सविस्तर प्रक्रिया पालकांना समजावून सांगितली. “क्रिकेटमध्ये मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी कोचच्या मार्गदर्शनासोबतच पालकांनीही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी धनंजय होनमाने, ॲक्सिस बँकेचे अधिकारी नवनाथ पाटील, प्रसिद्ध व्यावसायिक दत्तात्रेय भूमकर, रेल्वे युनियनचे नेते मनोज वाल्मिकी, अनुज कुमार चौधरी, शिरीष लोखंडे, प्रदीप टकले, बजरंग पवार, रवीकुमार वर्मा, सामाजिक कार्यकर्ते राहुल सर्वगोड, अविनाश चव्हाण, सिद्धेश्वर सरवदे आणि डॉ. कैलाश मुंदडा, राजू रंगम उपस्थित होते. प्रा. वाल्मीक कीर्तीकर यांनी प्रास्ताविक केल. ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक निलेश गायकवाड यांनी या शिबिरामागची भूमिका आणि त्याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले. विनोद पाटील यांनी आभार मानले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विनोद पाटील, राजेंद्र सिंग बोमरा, राहुल म्हेत्रे, मल्लिनाथ कापसे, दीपक सुरवसे, आनंद पाटील, नितीन टेकाळे आणि सुशील कन्ना यांनी परिश्रम घेतले.























