बार्शी – तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, बाभुळगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते व इतर साहित्य असा एकूण २ लाख ३२ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान बाभुळगाव येथे काही इसम अवैधरित्या पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह
संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यामध्ये घटनास्थळी पत्त्यांच्या साहाय्याने जुगार खेळणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, पत्ते तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, एकूण २,३२,९३० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाणे गुहा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम १२ (अ) अंतर्गत गुहा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे- चांगदेव मुकुंद लोंढे, धनंजय भगवान शिंदे, निलेश गजेंद्र शिंदे, किशोर विक्रम शिंदे, गोरखनाथ अजिनाथ शिंदे, सिद्धेश्वर चंद्रा शिंदे, गणेश मिटू नवले, विजय हरिदास अडसूळ, चंद्रकांत दशरथ झिने, लक्ष्मण पांडुरंग झिने, भरत पंढरीनाथ शिंदे, विजय विठ्ठल शिंदे आणि पांडुरंग श्रीधर उघले (सर्व रा. बाभुळगाव, ता. बार्शी),
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे तसेच राजेंद्र मंगरुळे, अरुण डुकळे, सागर वाकळे, शशिकांत लोकरे, महेश माने आणि शिवशंकर खराडे यांनी सहभाग घेतला.
अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 3