सोलापूर – नवी पेठेतील शिवस्मारक येथे सोमवार दि. ३१ ऑगस्ट ते रविवार दि. १३ सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी ६.४५ ते ८ या वेळेत योगसेवा मंडळाचे योग शिबीर होईल. गेल्या चाळीस वर्षात ३७५ हून अधिक शिबिरामध्ये शिकवण्याचा अनुभव असलेले मनमोहन भुतडा हे मुख्य प्रशिक्षक असतील. अनेक योग स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवणारे मंडळाचे सदस्य प्रात्यक्षिके सादर करतील. शिबीर पूर्ण करणारांना प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम येणाऱ्या फक्त पन्नास जणांनाच शिबिरात प्रवेश देणार आहे. इच्छुकांनी सुभाष जोशी (७०२०५००४१९) अथवा विद्या होनमोडे ९४२२५५६७८१ यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन योग सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष सासवडे .सचिव दत्तगुरू वेदपाठक यांनी केली आहे.





















