Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुणाई ‘Priga 300’ आणि ‘नशेच्या इंजेक्शन’च्या विळख्यात; विक्रेते मालामाल, अधिकारी मात्र सुस्त!

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
करमाळा – शहरासह ग्रामीण भागात सध्या तरुण पिढी एका अत्यंत घातक आणि जीवघेण्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. तरुणांमध्ये सध्या ‘Prega 300’ (प्रिगाबालिन) या गोळ्या आणि विविध प्रकारच्या नशेच्या इंजेक्शनची मोठी क्रेझ निर्माण झाली असून, करमाळ्याची तरुण पिढी वेगाने अंमली पदार्थांच्या दलदलीत रुतत चालली आहे. या गंभीर परिस्थितीचा गैरफायदा घेत काही बेकायदेशीर विक्रेते आणि मेडिकल माफिया गब्बर होत असताना, जबाबदार अधिकारी वर्ग मात्र हातावर हात धरून ‘गप्प’ बसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
•काय आहे ‘Prega 300’ चा प्रकार?
मूळत: ‘प्रिगाबालिन ३०० एमजी’ हे औषध मेंदूच्या नसांशी संबंधित तीव्र वेदना कमी करण्यासाठी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने फिट्स (मिरगी) सारख्या आजारांवर दिले जाते. परंतु, या गोळ्यांचे अतिप्रमाण घेतले असता एक वेगळ्याच प्रकारची नशा चढते. हेच कारण आहे की, करमाळ्यातील महाविद्यालयीन तरुण, अल्पवयीन मुले आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार या गोळ्यांच्या आहारी गेले आहेत. यासोबतच काही विशिष्ट प्रकारची वेदनाशामक इंजेक्शन्स देखील नशेसाठी सर्रास वापरली जात आहेत.
•विक्रेते मालामाल, तरुण कंगाल!
या नशेच्या बाजारात एजंट आणि काही काळेधंदेवाले सक्रिय आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय  ही औषधे देणे कायद्याने गुन्हा असतानाही, केवळ पैशांच्या हव्यासापोटी काही ठिकाणी ही औषधे चढ्या दराने विकली जात आहेत.
•१० ते २० रुपयांना मिळणारी गोळी नशेबाजांना १०० ते १५० रुपयांना विकली जात आहे.
 या काळ्या बाजारामुळे विक्रेत्यांचे खिसे भरत आहेत, तर दुसरीकडे हजारो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून त्यांचे कुटुंबे रस्त्यावर येत आहेत.
•अधिकारी वर्ग सुस्त; कुणाचे अभय?
शहरातील काही विशिष्ट भागात, कट्ट्यांवर आणि निर्जन ठिकाणी औषधांच्या रिकाम्या पट्ट्या आणि इंजेक्शनच्या सुया मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ही बाब उघडकीस येऊनही अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलीस प्रशासन  याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
अधिकारी वर्ग नेमकी कशाची वाट पाहत आहे? शहरात एखादा मोठा अनर्थ घडल्यावर प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल करमाळ्यातील सुज्ञ नागरिक विचारत आहेत.
•पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा!
या प्राणघातक नशेमुळे तरुणांमध्ये चिडचिडपणा वाढणे, गुन्हेगारी प्रवृत्ती बळावणे, आणि अकाली मृत्यू येण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपल्या घरातील तरुण मुलगा काय करतो, त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्याकडे जास्त पैसे कुठून येतात आणि त्याच्या वर्तनात काही बदल झाला आहे का, यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.
•तात्काळ कारवाईची मागणी
करमाळा शहराला लागलेला हा नशेचा कलंक पुसण्यासाठी प्रशासनाने आता तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवर आणि एजंटांवर छापे टाकून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करमाळा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि पालकांनी केली आहे.
Post Views: 36
Previous Post

पंढरपुरातील भुरट्यासुरट्या दादामंडळींवर पोलिसांचा कारवाईचा बडगा

Next Post

शिक्षक कै.राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षक कै.राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

शिक्षक कै.राजेंद्र ढोले यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991335

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!