Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बालकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम; प्रत्येक मुलाची तपासणी, निदान आणि उपचारांवर भर

तरुण भारतbyतरुण भारत
August 5, 2026
in solapur
0
बालकांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम; प्रत्येक मुलाची तपासणी, निदान आणि उपचारांवर भर
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्ह्यातील एकही बालक आरोग्य तपासणी, उपचार किंवा शस्त्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला अधिक गती दिली आहे. केवळ आरोग्य तपासणी करून थांबायचे नाही, तर तपासणीत आढळलेल्या प्रत्येक आजारावर वेळेत उपचार होऊन आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
             जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य, शिक्षण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांनी समन्वयाने काम करून प्रत्येक पात्र बालकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ५२ आरोग्य पथके कार्यरत असून, ही पथके अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे तसेच शाळांमधील ७ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करत आहेत. तपासणीदरम्यान जन्मजात व्यंग, कुपोषण, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच इतर गंभीर आजारांचे निदान करून संबंधित बालकांना तातडीने उपचारासाठी संदर्भित केले जात आहे.
         या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक मयुर पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चौकट
७२ हजार ७७ विद्यार्थ्यांची तपासणी
जून-जुलै २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, अंगणवाडीतील २ लाख ६९ हजार ५१६ बालकांच्या उद्दिष्टापैकी १ लाख ९९ हजार ६४४ बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. तर एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत शाळांमधील ७२ हजार ७७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
चौकट
३९ बालकांना मिळणार नवे आयुष्य
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ३९ बालकांची ओळख पटली असून, त्यांच्या ११ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शासनाच्या माध्यमातून हा संपूर्ण उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असल्याने या बालकांना नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोट
आजाराचे वेळेत निदान, उपचार आणि आवश्यक
बालकांच्या आरोग्याची तपासणी ही केवळ औपचारिकता न राहता, प्रत्येक आजाराचे वेळेत निदान, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करावा. एकही बालक उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची खात्री करणे हीच खरी जबाबदारी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 7
Previous Post

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

शंकरनगर येथे  रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शंकरनगर येथे  रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन

शंकरनगर येथे  रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

एस.ई.एस. पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028976

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!