Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आधी लिफ्ट मागितली, नंतर दारूसाठी पैसेही मागितले, नाशिकच्या पंचवटीतील खुनाचा उलगडा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 24, 2023
in maharashtra
0
आधी लिफ्ट मागितली, नंतर दारूसाठी पैसेही मागितले, नाशिकच्या पंचवटीतील खुनाचा उलगडा
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिकच्या  पंचवटी परिसरात आढळलेल्या मृत तरुणाची ओळख पटविण्यासह खूनाचा उलगडा करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने दुचाकीवर लिफ्ट दिलेल्या तरुणांनीच ऋषीकेशला संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील लिंकरोडवरील समर्थ नगर परिसरात मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. सुरवातीला मृत युवकाची ओळख पटविणे देखील मुश्किल झाले होते. अशातच पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. मृत तरुणाने आदल्या रात्री रस्त्याने जाणाऱ्या युवकांकडे लिफ्ट मागून पुन्हा दोघांशी वाद घातला. त्यातून दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे.

शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद रोड लिंकरोडवरील पाटालगत, हमालवाडी, पंचवटी येथे शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्हयातील अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यास व त्यास ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांना दिल्या.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पथकांमार्फत नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, गंगापूर, हिरावाडी, म्हसरूळ, गंगाघाट, सरकारवाडा परीसर पिंजून काढण्यात आला. पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत तरुण ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव असल्याचे निष्पन्न केले. गुन्हयातील मयताची ओळख पटल्यानंतरही मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी पथकातील अंमलदारांसह दोन दिवस गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान पोलिसांना तपासात दोन विधीसंघर्षित बालकांनी ऋषिकेशचा खून केल्याचे निष्पन्न केले. पोलिसांना दोघांना तपासकामी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत दोघांनी ऋषिकेशचा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.

दोन विधीसंघर्षित बालक शुक्रवारी रात्री त्यांचे मित्राला सोडण्यासाठी दुचाकीने सातपूरला गेले. मित्राला सोडल्याने ते पंचवटीकडे येत असताना रात्री 11.45 वाजता सातपूर परीसरात ऋषिकेशने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. मला हमालवाडी पाटाजवळ सोडा, असे त्याने सांगितले, त्याप्रमाणे दोघांनी त्यास लिफ्ट देत रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्यास शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद रोड लिंकरोड वरील पाटालगत सोडले. त्यावेळी मद्यधुंद ऋषिकेशने दोघांकडे दारूसाठी पैसे मागितले. त्यावेळी दोघांनी आम्ही तुला लिफ्ट दिली आणि पुन्हा दारूसाठी आमच्याकडे पैसे मागतो, असे सांगितले. राग अनावर झाल्याने ऋषिकेशने त्यांना शिवीगाळ करून त्यातील एकाची कॉलर पकडली. त्यातून तिघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात दोघांनी ऋषिकेशला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर दगडाने ठेचून त्यास ठार केले..

 

Post Views: 104
Previous Post

ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर; कुठे आणि कधी पाहता येणार इव्हेंट? जाणून घ्या

Next Post

बादशाहला कोर्टाचे अल्टीमेटम ; 7 फेब्रुवारीपर्यंत नागपूरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बादशाहला कोर्टाचे अल्टीमेटम ; 7 फेब्रुवारीपर्यंत नागपूरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश…

बादशाहला कोर्टाचे अल्टीमेटम ; 7 फेब्रुवारीपर्यंत नागपूरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश...

ताज्या बातम्या

अरे वा …क्या बात है ! जर्मनीत शिका अन लाखो कमवा… #marathinews #news

June 3, 2026

सावधान भेसळ कराल तर कारवाई होणारच #solapurnews #news

June 3, 2026

लाडक्या बहिणींनो केवायसी पूर्ण केलं असेल तरच मिळतील पैसे #viral #news

June 3, 2026

जिथे पुरुष तिथे महिलांच्या बाळंतपणाची व्यवस्था कशी काय खासदार शिंदेनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

June 3, 2026

आता शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती

June 3, 2026

सात मिनिटांचा व्हिडिओ बनवत सगळे संपवले

June 3, 2026

अखेर गोपाळगड झाला मोकळा #marathinews #news

June 3, 2026

नागेश भोसलेंची सही बनावट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0891791

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697