Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जगातील सर्वात मोठी विहीर खोदणारा बीडचा पठ्ठ्या, तब्बल एक एकरात विहीर खोदली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 11, 2023
in maharashtra
0
जगातील सर्वात मोठी विहीर खोदणारा बीडचा पठ्ठ्या, तब्बल एक एकरात विहीर खोदली
0
SHARES
316
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी संकटात पिचला जात आहे. मात्र, या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने अजबच नाद केलाय. तब्बल दीड एकर शेतामध्ये २ कोटी रुपये खर्च करून विहीर बनवली आहे. यामुळं आता ३-४ वर्ष जरी पाऊस झाला नाही तरी जवळपास ५० एकरवर शेती बागायती होऊ शकते. पाहुयात दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वांत मोठी विहीर म्हणून नोंद ठरु शकणाऱ्या, नाद खुळ्या शेतकऱ्याची कशी आहे ती विहीर? या स्पेशल रिपोर्टमधून.

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या पाडळसिंगी गावचे शेतकरी मारोती बजगुडे यांनी ही विहीर बनवली आहे. शेतकरी मारोती बजगुडे यांना १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो त्यामुळे त्यानी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरविले.

मात्र सुरूवातील यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु त्यावर यशस्वीपणे मात करत मारोती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती. सुरूवातीला या विहीरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना १५ ते २० लाख रूपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज ८० मजूर यासाठी काम करीत होते. तर १० हायवा यातील माती व दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहीरीसाठी जवळपास दोन कोटींचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगीतले.

या अवाढव्य विहीरीत १० कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता आहे. लांबून पाहील्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात ती एकमेव ठरण्याची शक्यता आहे. मारोतीराव बजगुडे यांना असलेल्या १२ एकर शेतीपैकी ८ एकरमध्ये त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच या विहीरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

तर या विहिरीची माहिती मिळाल्याने, विहीर पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. गाव परिसरासह बीड, गेवराई यासह अनेक ठिकाणाहून ही विहीर पाण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक येत आहेत. तर विहीर पाहून अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरत नाही. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील मारुती बजगुडे यांचा आदर्श घ्यावा आणि आठ-दहा शेतकऱ्यांमध्ये अशी विहीर खोदावी, जेणेकरून बीड जिल्हा दुष्काळ मुक्त होईल. अशी प्रतिक्रिया पाहण्यासाठी आलेल्या गोवर्धन मांडे यांनी दिली आहे

दरम्यान, बीड जिल्ह्यात कधी अस्मानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतात होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे सततच्या दुष्काळावर तोडगा काढताना मारुती बजगुडे या शेतकऱ्यांने तब्बल दोन कोटींची दीड एकर शेतामध्ये विहीर खोदली आहे. त्यामुळे आता ही विहीर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीचं विहीर असण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी “मारुती बजगुडे यांनी नाद केला पण वाया नाही गेला” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Post Views: 243
Previous Post

जगातील सर्वात लांब प्रवासावर निघाले जहाज.. रामनगर बंदरात पोहोचले ‘गंगा विलास क्रूज’

Next Post

मुंबईच्या रस्त्यावरच दोन मित्रांवर गोळीबार; ४५ कोटी रुपयांचं टेंडर ठरलं कारणीभूत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईच्या रस्त्यावरच दोन मित्रांवर गोळीबार; ४५ कोटी रुपयांचं टेंडर ठरलं कारणीभूत

मुंबईच्या रस्त्यावरच दोन मित्रांवर गोळीबार; ४५ कोटी रुपयांचं टेंडर ठरलं कारणीभूत

ताज्या बातम्या

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

मनपा आयुक्तांनी सुधारित पाणीपुरवठा आणि करवाढीच्या विषयावर दिली माहिती

April 21, 2026

नागपुरात धक्कादायक प्रकार;समाजसेवेच्या नावावर एनजीओ संस्थापक करायचा धर्मांतर ..

April 21, 2026

सांगली प्रवाशांना लुटणाऱ्या गुंडाला नागरिकांनी धुतलं

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822000

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697