श्रीपूर – महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील रोजंदार कामगारांना औद्योगिक न्यायालय अहिल्या नगर यांनी जानेवारी १९९९ ते डिसेंबर २०११ पर्यंत समान कामास समान वेतनाची रक्कम काढून पन्नास टक्के रक्कम देण्याचा व जानेवारी २०१२ पासून शंभर टक्के देण्याचा मा. उच्च न्यायालय खंडपीठ (संभाजीनगर ) यांनी निकाल दिला आहे त्यामुळे शेती महामंडळ कामगार लढा कृती समीतीला फार मोठे यश मिळाले आहे . त्यामुळे राज्य शेती महामंडळ रोजंदारी कामगारांत आनंदाचे वातावरण पसरले आहे . शेती महामंडळातील कामगारांना कायम कामगारांच्या दराप्रमाणे समान कामास समान वेतन मिळावे म्हणून कामगार लढा कृती समितीचे लढाऊ नेते सुभाष कुलकर्णी कोपरगाव तालुका साखर कामगार सभा श्री अविनाश आपटे साखर सभा श्रीरामपूर व आनंदराव वायकर श्रीगोंदा तालुका साखर कामगार युनियन यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये दाद मागीतली होती . दरम्यान खंडकरी शेतकरी यांना जमिन वाटप करण्याच्या वेळेस मा रामराजे कमिटी चे शिफारशी प्रमाणे मा उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर समोर राज्य सरकारने व शेती महामंडळाने कामगारांच्या देय रक्कमही देण्याचे मान्य केले होते त्या प्रमाणे कामगार संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा मागणी केली आहे आंदोलन करुन देय रक्कम देण्याची मागणी केली होती . तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांच्या समितीने कामगारांची १४२ कोटी पन्नास लाख रुपये इतकी देय रक्कम काढली ९९ कोटी पन्नास लाख देय रकमेवर सर्व संमती झाली . तरीही कामगारांना पैसे मिळत नव्हते त्यामुळे संभाजीनगर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली यावर उच्च न्यायालय खंडपीठ , संभाजीनगरचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी शेती महामंडळातील याचिका नामंजूर केली व शेती महामंडळाच्या सहा हजार कामगारांना ऑगस्ट १९९९ ते डिसेंबर २०११ या काळातील समान काम समान वेतन देण्याचा आदेश दिला . या निर्णयामुळे रोजंदार कामगारांना पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे व जानेवारी २०१२ पासून १५ डिसेंबर २०१५ पर्यंत समान कामास समान वेतनाची शंभर टक्के रक्कम मिळणार आहे . या निर्णयाचे स्वागत बाबासाहेब बोर्डे सागर मिसाळ अशोकराव पाटील वेणुनाथ बोळीज सुधाकर चव्हाण भालचंद्र शिंदे पाटील बाबुलाल पठाण रमेश परजणे कारभारी बत्तासे भास्कर बोर्डे भालचंद्र कोल्हटकर मिराज मुलाणी बाळासाहेब शिंगाडे सुनील बनकर एडवोकेट संजय चंदनशिवे राजू पठाण चंद्रकांत केंदळे राजू शिरसाठ शेखर काटे श्रीपूर ऊस मळ्याचे भालचंद्र शिन्दे यांनी केले आहे .
फोटो:
Post Views: 12