Friday, August 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 25, 2023
in marathwada
0
२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाजारात पडलेले कांद्याचे दर, अवकाळी पावसानं होणारं नुकसान यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं आहे. मात्र, कांदा उत्पादकांचा प्रश्न सुटताना दिसत नाही. कांदा उत्पादकांच्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याचं चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बिभीषण करळे यांनी २४४५ किलो कांदा ४७ पोत्यातून बाजार समितीत नेला होता. कांद्याला १५ ते १६ रुपयांपर्यंत भाव मिळेल, अशी माहिती चौकशी केल्यानंतर त्यांना मिळाली होती. मात्र, जेव्हा बाजार समितीत ते पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. व्यापाऱ्यालाच स्वतःच्या खिशातून ८०६ रुपये देऊन त्यांना गावाकडे परतावे लागले.

विठ्ठलवाडी येथील बिभीषण करळे यांना आपल्या शेतातील ४७ पोती म्हणजे २४ क्विंटल कांद्याची पट्टी २२१२ रुपये आली, तर आडतीवर खर्च ३०१८ रुपयांचा खर्च झाला. या शेतकऱ्याने तीन प्रतीत कांद्याची वर्गवारी केल्यावर २४ क्विंटल ४५ किलो वजन भरले. ५०, ७५ आणि १०० प्रति क्विंटल रुपयांप्रमाणे दर मिळाला. करळे यांची २२१२ रुपयांची पट्टी झाली. यामध्ये तोलाई, हमाली, हाताळणी, वारणी, वाहतूक भाड्याचे मिळून ३०१८ रुपये खर्च आला. यामुळे करळे यांना स्वतःच्या खिशातील अतिरिक्त ८०६ रुपये सोलापूरच्या आडत्याला द्यावे लागले.

करळे यांनी आपल्या दोन एकर उसात आंतरपीक म्हणून कांदा लावला. प्रचंड मेहनतीने कांद्याचे चांगले पीक आले.परंतु, अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याचा कांदा भिजून मोठे नुकसान झाले. पावसापासून कसाबसा वाचविलेला ४७ पोती कांदा सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जातच भाव न मिळाल्याने पदरमोड करून निराश होऊन घरी परतावे लागले.

बिभीषण करळे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना कांद्याची रोपं बाहेरुन आणली होती. कांदा लागवडीपासून आतापर्यंत ३० ते ३५ हजार रुपये खर्च झाला. सोलापूरच्या बाजार समितीत कांदा नेण्यापूर्वी अवकाळीनं मोठं नुकसान झालं. चांगला कांदा विक्रीला नेण्यापूर्वी सोलापूरला चौकशी केली होती. १५ ते १६ रुपये देऊ असं म्हटले होते तिथं घेऊन गेलो अनं कांद्याचा लिलाव झाला नाही. अखेर २४४५ किलो कांदा विकला पण त्यातून काही रक्कम मिळण्याऐवजी ८०६ रुपये व्यापाऱ्यांना पदरचे द्यावे लागले, असं बिभीषण करळे म्हणाले. कांदा लागवडीतून काही परवडलं नाही, असं करळे म्हणाले.

सारिका बिभीषण करळे यांनी लागवड, खुरपणी, काढणी वेळी मोठा खर्च झाल्याचं सांगितलं. सोलापूरला कांदा घेऊन गेलो तिथं ४७ पोत्याचे २२०० रुपयांच्या आसपास बील झाले. कांदा लागवडीसाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च झाले. आता व्यापाऱ्यालाच ८०६ रुपये दिले आहेत. या कांद्याचं करायचं काय? नुकसान झालं आणि भाव पण भेटला नाही, असं सारिका करळे म्हणाल्या.

Post Views: 159
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा, दादरा आणि नगर हवेलीमध्ये अनेक विकास उपक्रम सुरू केले….

Next Post

२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…

२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती...

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

August 7, 2026
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

August 7, 2026
करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

August 7, 2026

तीर्थ येथे सापडला मेईदेव राजाचा शिलालेख

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1033392

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!