माळशिरस – तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून आज आणखी मोटेवाडी (मा),सुळेवाडी या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यात पिंपरी, कोथळे, गारवाड, पठाणवस्ती, शिवारवस्ती, फडतरी, शिंगोर्नी, निटवेवाडी या आठ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असून अद्यापही पावसाने ओढ दिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. नाले, ओढे,तलाव कोरडे पडू लागले आहेत.आज सुळेवाडी येथील ९ वस्त्यांना ,२४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने ४ खेपा करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला
आहे.tr मोटेवाडी ( मा) येथील ११ वस्त्यांना २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या ५ खेपा करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता सदावरे यांनी दिली.यावेळी पाणी पुरवठा व सहाय्यक करांडे उपस्थित होते.