बार्शी – अर्णव शैक्षणिक संकुल, वैराग यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय, कारीच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी केली. १७ वर्षे मुलींच्या अंतिम सामन्यात श्री शिवाजी विद्यालय, कारीच्या संघाने शारदादेवी विद्यालय, वैरागच्या संघाचा तब्बल २३ गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय
कामगिरीमुळे कारी विद्यालयाच्या १७ वर्षे मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली असून, जिल्हास्तरीय सामने सांगोला येथे होणार आहेत. दरम्यान, १४ वर्षे मुलींच्या संघाने तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, तर १४ वर्षे मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक सचिन लोहार व रोहन ढेंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.