मोडनिंब – (ता.माढा) येथील श्रीमंत सौ. उमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन ‘उमा डे’
मातृदिनोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोडनिंब शहरातून भव्य फेरी काढण्यात आली.या फेरीत उमा संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदाधिकारी सहभागी झाले होते.लेझीम पथक, तसेच विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनामुळे फेरीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.शहरातील दत्त चौक, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, स्टेशन रोड प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने दिलेल्या योगदानाचा गौरव करत मातृदिनोत्सवाची परंपरा यंदाही उत्साहात जपण्यात आली. संस्थेच्या कार्याचा आणि शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच मोडनिंब व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.