श्रीपूर – मनुष्य प्राण्याच्या जीवनात परमात्मा परमेश्वरा बद्दल अपार श्रद्धा महत्वाची आहे . त्याचे नामस्मरण, चिंतन व सत्संग केल्या शिवाय मनुष्याच्या जीवनाला अर्थ नाही असे प्रतिपादन हभप पुनमताई साळुंखे यांनी केले .
श्रीपूर येथिल ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक श्रध्देय कै . सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृती निमित स .म . साखर कारखान्याचे माजी व्हा . चेअरमन रामभाऊ सावंत – पाटील यांच्या मार्गदशना खाली महाळुंग पं. स . चे माजी सदस्य अनिल जाधव मित्र परिवाराच्या वतीने शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे . शिवपुराणाचे महत्व सांगताना त्या म्हणाल्या की, याच्या श्रवणाने मुनुष्यातीत दोष दूर होतात . त्यासाठी सेवाभाव असणे महत्वाचे आहे . परोपरकाराने शिव प्रसन्न होतो . नाहीतर रावणाकडे भरपूर संप्पत्ती होती. सात कोटी सोन्याची घरे होती नुसती दाराची चौकटच साडे बावीश्शे (२२५० ) किलोची होती . अहंकारी होता, कैलास पर्वत हातावर घेवून हालवू शकत होता एवढे बळ होते , परंतू सत्संग व परोपरकार नव्हता म्हणून सर्व नाहीसे झाले . शिव हा भोळा आहे भक्ताला जे पाहीजे त्यापेक्षा जास्त देणारा आहे मात्र भाव तसा पाहीजे असे त्या म्हणाल्या .
उत्सव मंगळवार दि . १८ ऑगस्ट रोजी ( वेळ सायंकाळी ७ ते रात्री ९.३० )सुरु झाला असून सोमवार दि . २४ ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे . कथेस मोठ्या संख्येने भावीक विशेषत: महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय आहे .
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – : – – – – – – – – .- -.- कै . सुधाकरपंत यांचे कार्याचे स्मरण – – –
– आज श्रीपूर येथिल पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराचा विकास होत आहे . कै . सुधाकरपंत परिचारक यांचे कार्याचे स्मरण राहावे या एकमेव उद्देशाने आम्ही आमचे मार्गदर्शक स .म . कारखान्याचे माजी व्हा . चेअरमन रामचंद्र सावंत – पाटील यांच्या मार्गदर्शना खाली दर श्रावण महिन्यात या उत्सावाचे आयोजन करणार आहोत .
– . .. .. अनिल सज्जन जाधव .
Post Views: 20