पिलीव – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा या तालुक्यात अपघाताचे प्रमाण चिंताजनक आहे .रस्ते वाहतूक व रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जिल्ह्य अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांना सक्त निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्य अधिकारी कार्तिकेन यांनी सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्य महामार्ग सुरक्षा कृती दलाची स्थापना केली आहे .न्यायालयाच्या आदेशानुसार शहरी भागात दोन्ही बाजूस 30 मिटर अंतर ठेवणयाचा आदेश आहे .त्यानंतर चारपदरी, सहापदरी, दुपदरी यासाठी वेगवेगळी नियमावली आहे .महामार्गालगत सहा मिटर अंतरात व्यावसायिक बांधकाम नसावे. असा सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकष आहे .पण ग्रामीण भागातुन जाणाऱ्या महामार्गावर कुठेही नियमावलीचे अजिबात पालन केल्याचे दिसून येत नाही .यामुळे सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून ते प्रमाण सतत वाढतच चालले आहे.सातारा _ पंढरपूर ( एन.एच ई 548) हा दुपदरी महामार्ग आहे.या महामार्गावर सातारा पासुन अगदी कोरेगाव, पुसेगाव, गोंदावले, म्हसवड, पिलीव, साळमुख, तांदुळवाडी, भाळवणी,उपरी यासह महामार्गावरील कोणत्याही गावात अतिक्रमणाची जी नियमावली आहे ती कुठेच पाळलेली दिसतच नाही .या सर्वच गावात दोन्ही बाजुला हाॅटेल असो की इतर व्यावसायिक असो सर्वच व्यवसाय अगदी रस्त्यावरच थाटले आहेत.इतर महामार्गाला जी नियमावली आहे .तशी नियमावली पंढरपूर _ सातारा या महामार्गावरील अतिक्रमणासाठी नाही का असा सवाल प्रवाशयामधुन प्रशासनाला विचारला जात आहे .मोहोळ _ पंढरपूर हा महामार्ग दुपदरी आहे त्यासाठी 45 मिटरची अट आहे .मग पंढरपूर _ सातारा या महामार्गाला ही नियमावली का नाही .या महामार्गावरील सर्वच गावातील रस्त्यालगतच्या अतिक्रमणाची जिल्ह्य अधिकारी यांनी पाहणी करावी व अतिक्रमणाची स्थिती जाणुन घ्यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिक व प्रवाशयामधुन होत आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण सोलापुरचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांना पंढरपूर _ सातारा महामार्गाचा यामध्ये समावेश नाही का असे विचारले असता ते आमचयाकडे नाही .एम एस आर डी कडे असल्याचे सांगीतले.



















