पंढरपूर – ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे १० विद्यार्थी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे ३ विद्यार्थी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे २ विध्यार्थी असे मिळून एकूण १५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अजय रघुनाथ साळुंखे, अक्षय करण नारायणकर, दिनेश नागनाथ कांबळे, गणेश नवनाथ सुरवसे, लक्ष्मण नागनाथ पांढे, माऊली संजय गोरे, पार्थ तानाजी यादव, प्रताप नागनाथ लवळे, प्रतिक संजय दौंड, रमेश शिवराज कोळी, संग्राम प्रदीप काटकर, संस्कार सचिन बारटक्के, सत्यम बालाजी मुगळे, सुयश ज्ञानेश्वर इंगोले व सुयोग प्रदीप मैंदरकर या १५ विद्यार्थ्यांची निवड केली.
या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
————
चौकट :
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शैक्षणीत वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या तब्बल ४७३ पेक्षा जास्त संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अजूनही कांही कंपन्यांचे रिझल्ट्स येणे बाकी आहे. विद्यार्थ्यांची चिकाटी, स्वेरीची आदरयुक्त शिक्षणसंस्कृती, रात्र अभ्यासिका, विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये होणारी निवड होय.
Post Views: 10