मंगळवेढा – शहरातील एका हॉस्पिटल मध्ये काम करणारी 24 वर्षीय विवाहिता तथा परिचारीका कामावर जाते असे सांगून आली मात्र ती दवाखान्यात न येता अचानक बेपत्ता झाली असल्याची तिच्या वडिलाने मंगळवेढा पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलीस त्या परिचारीकेचा कसून शोध घेत आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी,यातील 24 वर्षीय बेपत्ता परिचारीका ही मंगळवेढा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामास असून तिचा दि.11 मे 2026 रोजी विवाह झाला असून ती ग्रामीण भागात रहावयास आहे. सणानिमित्त सदर परिचारीका ही तिच्या माहेरी गेली होती. दि.1 जून रोजी ती कुटूंबियास दवाखान्यात कामावर जाते असे सांगून बसने निघून आली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिच्या कुटूंबियाने सर्वत्र शोध घेतला तसेच हॉस्पिटल मध्ये येवून ती कामाला आली का? याबाबत चौकशी केली असता कामाला आली नसल्याचे दवाखान्यातून सांगण्यात आल्याने कुटूंबियाने पोलीसात तक्रार दाखल करुन तिचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
Post Views: 4