सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथील मेकॅनिकल विभागाच्या वतीने द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ३ दिवसीय सीएडी वर्कशॉप उत्साहात झाले. यासाठी सीएडी डेस्क, पुणेचे कृष्णा बिडवे यांनी विद्यार्थ्यांना विविध अभियांत्रिकी घटकांचे संगणकीय रेखांकन याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डिझाइनिंग, ड्रॉइंग, सॉफ्टवेअर हाताळणी आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यांना चालना मिळाली. समारोप समारंभात प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख, विभागप्रमुख प्रा.संदीप बावचे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना सीएडी वर्कशॉपचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.