सोलापूर – शालेय शहर बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला.
पार्क जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी नजीर शेख, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडीखंबे, ग्रँड मास्टर युवराज गायकवाड, बॉक्सिंग असोसिएशन सोलापूरचे जिल्हाप्रमुख अयाज शेख, उद्योगपती यशवंत इंगळे, पी.आय. बालाजी कांबळे, क्रीडा संघटक भीमराव बाळगे, शिवाजी नाईट कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संतोष गवळी, शिवदारे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. एम. बी. पाटील, बॉक्सिंग असोसिएशन सोलापूरचे जिल्हाप्रमुख अयाज शेख तसेच गिल्ली-डंडा असोसिएशन महाराष्ट्रचे संस्थापक सचिव शंकर गायकवाड, संघटना शहरप्रमुख अभिजीत गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेत सोलापूर शहरातील विविध शाळांमधून ३१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सम्राट गायकवाड, किशोर चंदनशिवे, भास्कर देडे, चंद्रकांत घोडके, आकाश साळवे, विश्वजीत गायकवाड, रमेश धोडमणी, नागेश कांबळे, सुनील बरगोदिया, संदीप गायकवाड, सुमित पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
——-






















