बार्शी – ब्रह्माकुमारीज राजयोग भवन, बार्शी येथे आयोजित भव्य रक्तदान महाशिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात एकूण ३९ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन हृदयरोगतज्ज्ञ व जनरल फिजिशियन डॉ. स्नेहल माढेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी समाजसेवक प्रशांत कथले यांची प्रमुख उपस्थिती होती. बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका संगितादीदी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करुन रक्तदान महाअभियानाची माहिती दिली.
‘रक्तदान हे महादान आहे’ या भावनेने रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनासाठी अमूल्य योगदान मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी डॉ. शुभांगी शिंदे यांनी केले.
Post Views: 16