वळसंग – पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कुंभारी शिवारात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका ६६ वर्षीय इसमास गंभीर मारहाण करून फोन केल्याची घटना सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
या घटनेत दर्याप्पा गंगाराम काळे (वय ६६, रा. पारधी कॅम्प, कुंभारी) यांचा खून झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्याप्पा काळे हे त्यांची मुलगी राजश्री साळुखे यांच्यासोबत आरोपी निलेश अडगळे यांच्या शेतातील वस्तीवर गेले होते. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून आरोपींनी लोखंडी खोरे, कुऱ्हाड व लाकडी बॅटने दर्याप्पा काळे यांना मारहाण करून गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला. तसेच फिर्यादी महिलेलाही लोखंडी फुकारीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी गु.र.नं. ५९४/२०२६ अन्वये BNS कलम १०३(१), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी निलेश अडगळे, प्रकाश अडगळे, मुकेश अडगळे व श्रीदेवी अडगळे या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, लोखंडी खोरे, लाकडी बॅट व लोखंडी फुकारी जप्त करण्यात आली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र टाकणे, सपोनी राहुल डोंगरे, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे व PSI रविराज कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसेच अप्पर उप अधीक्षक श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी टाकणे हे करीत आहेत.
सपोनि डोंगरे व वळसंग पोलीस ठाणे पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक केली
घटनास्थळी परिस्थिती शांत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Post Views: 5