एअर इंडिया एक्स्प्रेसची सुमारे 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. एअरलाईन्सचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यामुळे मंगळवार आणि बुधवारची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या घटनेची नागरी विमान वाहतूक प्राधीकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय.
याबाबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही केबिन क्रू मेंबर्स मंगळवारी रात्रीपासून अचानक आजारी पडले. त्यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली. हे का घडले ? हा प्रकार जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, यामुळे प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांना अचानक झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.