सोलापूर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘गुणवंत कामगार पुरस्कार ‘ वितरण कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे उत्साहात पार पडला.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते आणि पक्षनेते नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, कामगार नेते रवींद्र मोकाशी,नगरसेवक समाधान आवळे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली नगरसेवक रवीसिंग कय्यावाले ,आयोजक सुरेश पाटोळे,श्रीकांत बोराडे, ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार मोरे, अनिल लोंढे , लेखक किशोर जाधव, लष्कर मातंग समाजाध्यक्ष भीमराव गायकवाड, रोहित खिलारे, प्रवीण वाडे, जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे सावित्री महिला संघटनेच्या प्रमिला जाधव डॉ. आतिश बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, वर्षभर कष्ट करणाऱ्या गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे काम क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना करत आहे. यामुळे कामगारांमध्ये आपल्या कामाबद्दलची आवड निर्माण होणार आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखापर्यंतचा निधी महापालिकेच्या वतीने देण्याची ग्वाही दिली.प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वेश्वर गायकवाड , महेश तेजबिंदे, मुकेश गायकवाड, ओमकार पटवा, अभिषेक हटकर आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
यावेळी असफ फुलमामडी (आरोग्य सेवक ), विक्रम पाटोळे( लाईट विभाग, सोमपा ), अक्षय लोंढे ( भूमी मालमत्ता सुपरवायझर ), अक्षय पवार, पुष्पांजली राठोड (आरोग्य सेविका ), राजी सागालोलू , रेखा केंदळे, राजू डोलारे( मोदी स्मशानभूमी ऑपरेटर विद्युत दाहिनी ), मरिम्मा बोदुर , कविता दास , नेहा भोवळ , नागराज भोवळ ( बांधकाम कामगार), पार्वती विटेकर, रत्नमा बोदुर या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्मृतिचिन्ह ,शाल, श्रीफळ व फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


























