सोलापूर : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी त्यांचा सत्कार केला.
सोलापूर शहरातील विविध समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले.
सोलापूर जिल्हा दौराप्रसंगी सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी संजय शिरसाट यांचा शाल , निळी टोपी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, लखन कांबळे , भीमा मस्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



























