बार्शी – सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक श्री. शिवदास नलवडे, संस्थेच्या मार्गदर्शिका सौ. प्रतिभा नलवडे, मुख्याध्यापिका अलका जगताप तसेच उपमुख्याध्यापक येवले सर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर संस्थापक शिवदास नलवडे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व समजावून सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी एकजूट, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


























