वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज बहुप्रतिक्षित धर्मवीर_२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे पोस्टर लॉंच
चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही धर्मवीर आनंद दिघे जीवनपट उलगडणार आहे. लाखो शिवसैनिकांसह प्रेक्षकांनाही चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा असून दुसऱ्या भागातून हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून याप्रसंगी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
यासमयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.