Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रक्ताच्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पाहिजे… ‘मराठा आरक्षण’ मुद्द्यावर किरण मानेंचा एल्गार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 5, 2023
in maharashtra
0
रक्ताच्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पाहिजे… ‘मराठा आरक्षण’ मुद्द्यावर किरण मानेंचा एल्गार
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभर वातावरण पेटलं, अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत दिला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

 

सध्या राज्यभरात मराठी आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजतो आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. आंबड) इथं मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यात. दरम्यान ‘मुलगी झाली हो’ आणि ‘बिग बॉस मराठी ४’ फेम किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले. जरांगे पाटील जे काही बोलत आहेत, ते बोलण्यासाठी ‘जिगरा’ लागतो अशा शब्दात मानेंनी त्यांचे कौतुक केले. शिवाय य पोस्टनंतर होणाऱ्या ट्रोलिंगचीही पर्वा नसल्याचं माने यावेळी म्हणाले.

 

“माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो. आपल्याला धर्माच्या नावावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकऱ्यावर, मग वारकऱ्यावर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.

 

 

मनोज जरांगे पाटील… तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय, रक्त सळसळायला लागलंय, हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकाऱ्यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’

अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्या शेतकर्याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकऱ्यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असेपर्यन्त बोलत ऱ्हानार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे. न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम.-किरण माने.”

Post Views: 100
Previous Post

आज शिक्षक दिन! जाणून घ्या हा दिवस भारतात का आणि कशासाठी साजरा केला जातो..

Next Post

विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार

विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार

ताज्या बातम्या

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026
व्हि.जी.शिवदारे प्री प्रायमरी स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा 

व्हि.जी.शिवदारे प्री प्रायमरी स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा 

July 24, 2026
माऊली शिक्षण संस्थेत आषाढी वारीनिमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

माऊली शिक्षण संस्थेत आषाढी वारीनिमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0997399

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!