देशातील 6 राज्यांमधील 7 विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, शुक्रवारी सुरू आहे. या निवडणुकीत 5 जागा विरोधकांच्या आयएनडीआयए आघाडीने एकत्र येत लढल्या होत्या. यातील त्रिपुरामधील धनपूर आणि बॉक्सानगर जागांवर भाजपचा विजय झाला आहे.
राज्याच्या धनपूर विधानसभेच्या जागेवर भाजपच्या बिंदू देबनाथ यांचा विजय झाला. त्यांना 30 हजार 17 मते मिळाली. सीपीआय (एम) पक्षाचे कौशिक चंदा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. कौशिक यांना केवळ 11 हजार 146 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तर बॉक्सानगर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे तफज्जल हुसैन विजयी झाले आहेत. त्यांनी सीपीआय (एम) च्या मिझान हुसैन यांचा पराभव केला. मिझान यांना 3 हजार 909 मते मिळाली, तर तफज्जल यांना तब्बल 34 हजार 146 मते मिळाली आहेत.